जीवाला जीव देणारे मित्र, असं काय घडलं की ज्यामुळे तुटली अमिताभ बच्चन आणि कादर खान यांची मैत्री?
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
Kadar Khan-Amitabh Bachchan : कादर खान यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत अनेक सिनेमे केले होते. त्यांच्यात चांगली मैत्री होती. पण असं काय झाले की त्यांची मैत्री तुटली ?
2012 मध्ये कादर खान यांचे निधन झाले. कादर खान हे बॅलिवूडचे एक प्रसिद्ध कॅामेडी अभिनेते होते. तसेच त्यांनी खूप सिनेमांसाठी संवाद लेखनही केले होते. त्यांनी 300 पेक्षा जास्त सिनेमात काम केले होते. त्यात त्यांनी अनेक विनोदी भूमिका केल्या होत्या. कादर खान यांना बॅालिवूडच्या दिग्गज अभिनेत्यांसोबत आपण कायमच पाहिले आहे. त्यांच्या करियरची सुरुवात 1970 सालापासून झाली. त्यानंतर कादर खान हे अमिताभ बच्चन यांचे चांगले मित्र झाले. यावेळी ते आपल्या करियरच्या स्ट्रगल काळात होते. या दोघांची मैत्री दोन दशके ठीक होती. पण काही कारणांनी हे दोघं एकमेकांपासून लांब होत गेले. त्यांची मैत्री तुटत गेली.
कादर खान यांनी अमिताभ बच्चन यांच्या सोबत काही सिनेमांमध्ये काम केले होते. त्यांना आपण बेनाम (1974), अमर अकबर एंथॅानी (1977), मुकद्दर का सिकंदर (1978) आणि नसीब (1981) यांसारख्या सिनेमांमध्ये एकत्र पाहिले होते. 1970 च्या दशकात अमिताभ बच्चन यांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात केली होती. त्यापासून कादर खान आणि अमिताभ यांच्यात ताटातूट झाली.
advertisement
अमिताभ बच्चन यांचा बदललेला स्वभाव
समय टीव्हीच्या एका मुलाखतीमध्ये बोलताना कादर खान म्हणाले होते, "त्यांनी निवडणूक लढवली. ते राजकारणी बनले. खासदार झाल्यानंतर, ते आले तेव्हा त्यांचा स्वभाव पूर्ण बदलला होता. माझ्या एका प्रोड्यूसरने मला विचारले की, "तुम्ही सरांना भेटलात का ? "मी म्हटलं कोण सर ? त्यानी म्हटले, "बच्चन साहेब." मी उत्तरातच म्हणालो, कोण सर, मी अमितच म्हणतो त्यांना. प्रोड्यूसर म्हणाला, "त्यांना असे बोलणे आवडत नाही."
advertisement
अमिताभ बच्चन यांनी कादर खान यांना दूर केले.
view commentsतो किस्सा सांगताना कादर खान म्हणाले, " त्यापासून आमच्या गाड्या वेगवेगळ्या मार्गांवर गेल्या. ते सरजी होते आणि मी कादरजी होतो. कारण तेव्हा एका व्यक्तीने मला टाळले होते. त्याचे कारण होते मी अमितजींना सरजी म्हटले नाही. मी त्यांना अमित म्हणतो त्याचे कारण म्हणजे, मी त्यांच्या सांगण्यावरुन कित्येक सिनेमे सोडून दुसरे सिनेमे केले होते. बस संपले इथेच." त्यानंतर कादर खान यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत कधीच काम केले नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 23, 2025 2:21 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
जीवाला जीव देणारे मित्र, असं काय घडलं की ज्यामुळे तुटली अमिताभ बच्चन आणि कादर खान यांची मैत्री?


