Delhi Hotel Taj : 'इथे श्रीमंत येतात…’, कोल्हापुरी चप्पलांवर ताज हॉटेलच्या मॅनेजरने उद्योजिकेला सुनावलं, व्हिडीओ व्हायरल
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Sharddha Sharma Delhi Taj Hotel : दिल्लीतील ताज महाल हॉटेलमध्ये आपल्याला कोल्हापुरी चप्पल आणि बसण्यावरून अपमानित केल्याचा आरोप एका महिला उद्योजिकेने केला आहे.
नवी दिल्ली: दिल्लीतील ताज महाल हॉटेलमध्ये आपल्याला कोल्हापुरी चप्पल आणि बसण्यावरून अपमानित केल्याचा आरोप एका महिला उद्योजिकेने केला आहे. YourStory या नामांकित डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्मच्या संस्थापक आणि सीईओ श्रद्धा शर्मा यांच्याशी अपमानास्पद वर्तन झाल्याची घटना घडली आहे. त्यांनी व्हिडीओद्वारेच ही माहिती दिली. याबाबतचा व्हिडीओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
नेमकं काय घडलं?
श्रद्धा शर्मा ‘ताज महाल हॉटेल’मधील प्रसिद्ध House of Ming या फाईन डायनिंग रेस्टॉरंटमध्ये दिवाळीच्या जेवणासाठी आपल्या बहिणीसह गेल्या होत्या. त्यांनी कोल्हापुरी चप्पल आणि सलवार-कमीज परिधान केले होते. रेस्टॉरंटमध्ये त्या आपल्या खुर्चीवर मांडी घालून बसल्या. त्यावेळी रेस्टॉरंटच्या एका मॅनेजरने त्यांना “पाय खाली ठेवा आणि व्यवस्थित बसा, इथे श्रीमंत लोक येतात” अशी टिप्पणी केल्याचा त्यांचा आरोप आहे. याचबरोबर स्टाफने त्यांना क्लोज्ड शूज घालण्याचा सल्ला दिला. त्यामुळे या प्रकरणात अधिकच वाद निर्माण झाला.
advertisement
श्रद्धा शर्मा यांनी काय म्हटले?
या घटनेविषयी श्रद्धा यांनी व्हिडिओद्वारे भावना व्यक्त केल्या. त्यांनी म्हटले की, “मी कोल्हापुरी चप्पल माझ्या कष्टाच्या पैशांनी घेतली आहे. मी सभ्य पोशाखात इथे आली, तरीही मला पाय खाली ठेवा किंवा बसण्याच्या स्टाईलवर आक्षेप घेतला गेला. एक सामान्य नागरिक आपल्या मेहनतीच्या पैशाने हॉटेलमध्ये गेल्यावरही त्याचा अपमान केला जातो, हे दु:खद आहे. माझी चूक एवढीच की मी खुर्चीवर पद्मासन पद्धतीत बसले होते. जर एखाद्याला माझ्या चप्पला, बसण्याची पद्धत किंवा जीवनशैली त्रासदायक असेल, तर आपल्याकडे अजूनही वर्ग, श्रीमंती आणि संस्कृती यांचे भिंती आहेत, हे स्पष्ट होत असल्याचे त्यांनी म्हटले.
advertisement
एक आम इंसान, जो मेहनत करके, अपना पैसा कमा कर, अपनी इज़्ज़त के साथ ताज होटल में आता है — उसे आज भी इस देश में ज़लील और अपमानित होना पड़ता है।
और मेरी गलती क्या है? सिर्फ़ ये कि मैं बैठ गई एक “regular padmasana style” में?
क्या ये मेरी गलती है कि ताज मुझे सिखा रहा है कि कैसे बैठना… pic.twitter.com/vKBYjg8ltb
— Shradha Sharma (@SharmaShradha) October 21, 2025
advertisement
सोशल मीडियावर संतापाची लाट
या प्रकरणावर नेटिझन्सनी लक्झरी हॉटेलमधील ‘शिष्टाचार’ आणि ‘क्लास डिव्हाईड’वर प्रश्न उपस्थित केले आहेत. अनेकांनी श्रद्धा शर्मा यांना पाठिंबा दिला.
view commentsLocation :
New Delhi,New Delhi,Delhi
First Published :
October 23, 2025 2:05 PM IST
मराठी बातम्या/देश/
Delhi Hotel Taj : 'इथे श्रीमंत येतात…’, कोल्हापुरी चप्पलांवर ताज हॉटेलच्या मॅनेजरने उद्योजिकेला सुनावलं, व्हिडीओ व्हायरल


