Govinda : राग सोडून भाचीच्या लग्नाला येणार का गोविंदा? सून म्हणाली, 'ते आले तर मी...'
- Published by:Nishigandha Kshirsagar
Last Updated:
कृष्णा सुपरस्टार गोविंदाचा भाचा म्हणून इंडस्ट्रीत आला असला तरी या दोघांचं एका क्षुल्लक कारणामुळं भांडण झालं आहे. दोघांमध्ये अनेक वर्षांपासून अबोला आहे. त्यामुळेच आता हा रुसवा सोडून गोविंदा भाचीच्या लग्नाला येणार का याची चाहत्यांना उत्सुकता आहे. आता यावर गोविंदाची सून म्हणजेच कृष्णाची बायको कश्मिराने भाष्य केलं आहे.
मुंबई : गोविंदाची भाची आणि कॉमेडीचा बादशाह कृष्णाची बहीण आरती सिंग लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. आरती दिपक चौहानबरोबर 25 एप्रिलला लग्न करणार आहे. सध्या तिचे लग्नाआधीचे विधी धूम-धडाक्यात सुरु आहे. तिच्या संगीत, हळदी आणि मेहंदीचे फोटो समोर आले असून ते सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पण सध्या एकाच गोष्टींमुळं आरतीच्या लग्नाची चर्चा आहे, ती म्हणजे तिच्या लग्नात गोविंदा येणार की नाही. कृष्णा सुपरस्टार गोविंदाचा भाचा म्हणून इंडस्ट्रीत आला असला तरी या दोघांचं एका क्षुल्लक कारणामुळं भांडण झालं आहे. दोघांमध्ये अनेक वर्षांपासून अबोला आहे. त्यामुळेच आता हा रुसवा सोडून गोविंदा भाचीच्या लग्नाला येणार का याची चाहत्यांना उत्सुकता आहे. आता यावर गोविंदाची सून म्हणजेच कृष्णाची बायको कश्मिराने भाष्य केलं आहे.
कश्मिरा शाहने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत गोविंदाबद्दल भाष्य केलं आहे. कश्मिरा शाह म्हणाली, 'ते आमच्यावर रागावले आहेत. पण आरतीवर नाही. हे कृष्णाचं लग्न नाही. जर ते आमच्या लग्नाला आले नसते तर ते आमच्यावर नाराज आहेत म्हणून आले नाहीत, हे आम्ही मान्य केलं असतं. पण हे आरतीचं लग्न आहे. तिला तिच्या चिचीने लग्नाला यावं असं वाटतंय. मी त्यांना विनंती करते की या लग्नाला नक्की या.'
advertisement
छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत असा दिसतोय विकी कौशल; 'छावा' च्या सेटवरून पहिला फोटो समोर
कश्मिरा पुढे म्हणाली, 'आमच्या कुटुंबासाठी हा खूप आनंदाचा प्रसंग आहे. आम्ही या लग्नाला त्यांचं मोकळ्या मनाने स्वागत करू. ते माझे मामा आणि सासरे आहेत आणि मी त्यांची सून आहे. ते लग्नाला आले तर मी त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेईन. या दोन्ही कुटुंबात जो दुरावा आला त्यात आरतीचा काही संबंध नाही. हे सगळ्याच कुटूंबात घडतं. पण याचा अर्थ असा नाही की, आपण एकमेकांवर प्रेम करत नाही.' असं भाष्य कृष्णाच्या बायकोनं केलं आहे.
advertisement
advertisement
कृष्णाने गोविंदाचा भाचा म्हणून इंडस्ट्रीत सुरुवात केली. पण त्यानंतर या दोघात एका घटनेमुळं दुरावा निर्माण झाला. कृष्णानं त्याचा मामा गोविंदा आपल्या मुलांच्या बर्थडे पार्टीत सहभागी न झाल्यानं नाराज झाला. तर गोविंदाची बायको सुनिता यांनी आम्हाला या पार्टीत बोलावलं नसल्याचा आरोप केले. या घटनेनंतर दोन्ही कुटुंबात दुरावा वाढतच राहिला जो आजतागायत कायम आहे. त्यामुळेच आपल्या भाचीच्या लग्नाला गोविंदा येणार की नाही हे पाहणं महत्वाचं आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
April 23, 2024 10:19 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Govinda : राग सोडून भाचीच्या लग्नाला येणार का गोविंदा? सून म्हणाली, 'ते आले तर मी...'


