KBC 17 : 'मला शिकवू नका...' पाचवीत शिकणाऱ्या मुलाचं अमिताभला उलट उत्तर, चाहते संतापले, VIDEO
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
KBC 17 : 'कौन बनेगा करोडपती 17' मध्ये एका मुलाने अमिताभ बच्चन यांच्याशी केलेल्या वागणुकीमुळे लोक त्याच्यावर नाराज झाले आहेत. सोशल मिडियावर त्या मुलाचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. त्याच्या पालनपोषणावर सुद्धा प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
Kaun Banega Crorepati 17 : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या 'कौन बनेगा करोडपती'चा सीझन 17 सध्या सुरू आहे. नुकत्याच पार पडलेल्या एपिसोडमध्ये काही मुले हॉट सीटवर बसून होस्ट अमिताभ बच्चन यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना दिसली. बहुतेक मुले बिग बींशी खूप मैत्रीपूर्ण आणि आदराने बोलली. पण एका मुलाने मेगास्टारशी अशा पद्धतीने संवाद साधला की सोशल मीडियावर त्याला टीकेचा सामना करावा लागला. KBC 17 मध्ये आलेल्या या मुलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. इशित भट्ट हा मुलगा केबीसीच्या मंचावर अमिताभ बच्चन यांच्यासोबत उद्धटपणे बोलला आहे. इशित गुजरातमधील गांधीनगरचा रहिवासी असून तो पाचव्या इयत्तेत शिकतो. कार्यक्रमातील त्याच्या वागणुकीमुळे लोक चांगलेच चिडले आहेत.
बिग बींना म्हणाला,"मला नियम माहिती आहेत, समजावत बसू नका”
बिग बी यांनी केबीसीच्या मंचावर जेव्हा इशितला प्रश्न विचारायला सुरुवात केली, तेव्हा तो मेगास्टारला म्हणाला,"मला नियम माहिती आहेत, समजावत बसू नका.” नंतर जेव्हा बिग बी प्रश्न विचारू लागले, तेव्हा पर्याय देण्यापूर्वीच इशितने उत्तर लॉक करण्यासाठी सांगितले. तो आत्मविश्वासाने वागत होता. पण लोकांनी या वागणुकीला उद्धट म्हटले. नंतर कठीण प्रश्न आल्यावर इशितने बिग बींना म्हणाले ऑप्शन देण्यास सांगितले आणि नंतर उत्तर देताना म्हणाला, "सर, एक काय, त्यात 4 लॉक लावा, पण लॉक करा". परंतु इशितचे उत्तर चुकीचे ठरले आणि तो पैसे न घेता निघून गेला.
advertisement
नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त
इशितच्या वागणुकीवर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. तुमच्या मुलाला ज्ञान असल्यास ठीक आहे, पण त्यात शिष्टाचार नसेल किंवा तो मोठ्यांच्या समोर बोलायला शिकला नसेल तर तो कधीही यशस्वी होऊ शकणार नाही, मी अमिताभ बच्चन यांच्या जागी असतो तर त्याला दोन थप्पड मारल्या असत्या, हरला ते योग्यच झालं, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
advertisement
Most satisfying climax in KBC history pic.twitter.com/eLHy3PFA73
— Sagar (@sagarcasm) October 12, 2025
अमिताभ बच्चन यांनी विचारलेला प्रश्न काय होता?
अमिताभ बच्चन यांनी वाल्मिकी रामायणाशी संबंधित प्रश्न विचारला होता.'वाल्मिकी रामायणाच्या प्रथम कांडाचं नाव काय आहे?'
पर्याय होते:
अ. बाल कांड
advertisement
ब. अयोध्या कांड
क. किष्किंधा कांड
ड. युद्ध कांड
view commentsइशितने अयोध्या कांडा लॉक करण्यास सांगितलं होतं. पण या प्रश्नाचं अचूक उत्तर हे बाल कांड असं होतं. 25,000 रुपयांसाठीचा हा प्रश्न होता. विशेष म्हणजे अमिताभ बच्चन यांनीही हा व्हिडीओ शेअर केला आहे. बोलण्यासारखं काही नाही, अशी कॅप्शन त्यांनी लिहिली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 13, 2025 10:24 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
KBC 17 : 'मला शिकवू नका...' पाचवीत शिकणाऱ्या मुलाचं अमिताभला उलट उत्तर, चाहते संतापले, VIDEO