हातातून प्रोजेक्ट्स गेले, करिअर आलं धोक्यात; प्रसिद्ध K-Drama स्टारचा संशयास्पद मृत्यू, कारमध्ये सापडला मृतदेह
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Korean Actor Song Young Kyu Found Dead : दाक्षिणात्य कोरियन सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते सॉन्ग यंग-क्यू यांच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.
मुंबई : दाक्षिणात्य कोरियन सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते सॉन्ग यंग-क्यू यांच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. ३ ऑगस्ट रोजी ते त्यांच्या कारमध्ये मृतावस्थेत आढळले. त्यांच्या मृत्यूमागचं नेमकं कारण अद्यापही अस्पष्ट असलं, तरी पोलिसांनीया प्रकरणी तपास सुरू केला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी दारू पिऊन गाडी चालवल्याच्या आरोपांमुळे ते चर्चेत होते, पण अचानक त्यांच्या मृत्यूची बातमी आल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
कारमध्ये आढळला मृतदेह
५५ वर्षांचे अभिनेते सॉन्ग यंग-क्यू ३ ऑगस्ट रोजी ग्योंगगी प्रांतातील योंगिन येथील एका टाउनहाउसमध्ये त्यांच्या कारमध्ये मृतावस्थेत आढळले. कोरियाबू या स्थानिक वृत्तसंस्थेनुसार, त्यांच्या मृत्यूची नेमकी माहिती समोर आलेली नाही, पण पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
सकाळी एका ओळखीच्या व्यक्तीने त्यांना कारमध्ये पाहिले आणि त्यानंतर ही घटना समोर आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वीच सॉन्ग यंग-क्यू यांना दारू पिऊन गाडी चालवल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्या रक्तामध्ये ०.०८ टक्के अल्कोहोल आढळल्यामुळे त्यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली होती.
advertisement
हातातून प्रोजेक्ट्स गेले, करिअर आलं धोक्यात
सॉन्ग यंग-क्यू यांना दारू पिऊन गाडी चालवल्याच्या आरोपांमुळे मोठे नुकसान झाले होते. त्यांच्या हातातून अनेक प्रोजेक्ट्स काढून घेण्यात आले होते आणि काही भूमिकांमधूनही त्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. त्यामुळे त्यांचं करिअर धोक्यात होतं.
सॉन्ग यंग-क्यू यांच्या कुटुंबात त्यांची पत्नी आणि दोन मुली आहेत. त्यांच्या अचानक अशा प्रकारे कारमध्ये मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तसेच, त्यांच्या निधनाने कोरियन सिनेसृष्टीतील अनेकांना मोठा धक्का बसला आहे. त्यांनी 'बिग बेट', 'ह्वारांग', 'हॉट स्टोव्ह लीग' यांसारख्या अनेक प्रसिद्ध कोरियन चित्रपटांमध्ये आणि 'के-ड्रामा'मध्ये काम केलं होतं. त्यांच्या मृत्यूमागे नेमकं काय कारण आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 04, 2025 9:07 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
हातातून प्रोजेक्ट्स गेले, करिअर आलं धोक्यात; प्रसिद्ध K-Drama स्टारचा संशयास्पद मृत्यू, कारमध्ये सापडला मृतदेह