Loksabha Elections 2024 : खिशात 500 रुपये, उपाशीपोटी काढले दिवस; आज रवी किशन यांनी कमावलीय कोट्यवधी संपत्ती

Last Updated:

आता रवी किशन हे यंदा पुन्हा एकदा खासदारपदी निवडूक येणार का नाही हे काही वेळातच स्पष्ट होईल. त्यापूर्वी रवी किशन यांच्याविषयी काही गोष्टी जाणून घ्या.

News18
News18
मुंबई : भोजपुरी चित्रपटांचे 'अमिताभ बच्चन' म्हणून प्रसिद्ध असलेले रवी किशन हे आज हिंदी चित्रपटसृष्टीतील देखील एक प्रसिद्ध नाव आहे. त्यांनी अनेक भोजपुरी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. रविकिशन यांनी केवळ अभिनयातच नाव कमावले नाही, तर राजकारणातही त्यांनी आपला ठसा उमटवला आहे. रवी किशन हे उत्तर प्रदेशातील गोरखपूरचे खासदार आहेत. लोकसभा निवडणूक-2024 मध्ये भारतीय जनता पक्षाने (भाजप) गोरखपूरमधून रवी किशन यांना पुन्हा तिकीट दिलं आहे. आता रवी किशन हे यंदा पुन्हा एकदा खासदारपदी निवडूक येणार का नाही हे काही वेळातच स्पष्ट होईल. त्यापूर्वी रवी किशन यांच्याविषयी काही गोष्टी जाणून घ्या.
रवी किशन यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. त्यांचे वडील मंदिरात पुजारी होते. पण त्यांनी अभिनयक्षेत्रात जाऊ नये असं त्यांच्या वडिलांना वाटायचं. पण त्यांच्या आईने त्यांना पाठींबा दिला आणि मुंबईला येण्यासाठी 500 रुपयांची नोट हातावर टेकवली. मुंबईत त्यांना खूप संघर्ष करावा लागला. अनेक वेळा रिकाम्या पोटी झोपण्याची वेळ त्यांच्यावर आली. पण आज रवी किशन यांनी मेहनतीच्या जोरावर कोट्यवधींची संपत्ती कमावली आहे.
advertisement
रवी किशन यांच्याकडे 20 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती आहे. त्यात 15 लाख 57 हजार रुपयांचे दागिने आहेत. तसेच रवी किशन यांचे मुंबईत 6 फ्लॅट आहेत. प्रत्येक फ्लॅटची किंमत अंदाजे एक कोटी रुपये आहे. घरांसोबतच रवी किशन यांच्याकडे अनेक आलिशान गाड्या आहेत. त्याच्याकडे टोयोटा इनोव्हा आहे, ज्याची किंमत १४ लाख रुपये आहे. त्याच्याकडे 19 लाखांची मर्सिडीज बेंझ, 13 लाखांची BMW 15 आणि 40 लाखांची सर्वात महागडी Jaguar Fpace आहे. रवि किशन चित्रपट, वेब सिरीज, टीव्ही शो, जाहिराती, सोशल मीडिया याद्वारे मोठी कमाई करतात. याशिवाय त्यांना खासदार म्हणून पगार आणि इतर सुविधाही मिळतात.
advertisement
त्यानंतर रवी किशनला 'तेरे नाम' या चित्रपटातून ओळख मिळाली, या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. तर 2005 मध्ये त्यांच्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट प्रादेशिक चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. रवी किशन नुकतेच 'लापता लेडीज' या चित्रपटात झळकले होते. त्यांच्या भूमिकेचं खूप कौतुक झालं.
चित्रपटांमध्ये यश मिळवल्यानंतर त्यांनी राजकारणातही प्रवेश केला, यापूर्वी ते काँग्रेस पक्षात होते, पण 2019 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. रविकिशन हे गोरखपूरचे भाजपचे खासदार आहेत. ते संसदेत सक्रिय असतात. आता ते पुन्हा निवडून येणार की नाही याकडे चाहत्यांचं लक्ष आहे.
मराठी बातम्या/मनोरंजन/
Loksabha Elections 2024 : खिशात 500 रुपये, उपाशीपोटी काढले दिवस; आज रवी किशन यांनी कमावलीय कोट्यवधी संपत्ती
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement