'तुम 1 2 3 हो ना', दोन मुलांनी विचारला असा प्रश्न; माधुरी दीक्षितचं संपूर्ण आयुष्यच बदलून गेलं
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Madhuri Dixit : 'एक दो तीन' या गाण्याने माधुरीला घराघरात पोहोचवलं. पण तिचं स्टारडम तिला भारतात नव्हे तर अमेरिकेत गेल्यानंतर समजलं. माधुरीच्या पहिल्या ऑटोग्राफची स्टोरी.
मुंबई : 'तेजाब' या सुपरहिट सिनेमामुळे माधुरी दीक्षित प्रेक्षकांच्या मनात घर करून बसली. त्याआधीही माधुरीनं काही सिनेमात काम केलं होतं. पण तिला खरी ओळख ही तेजाब सिनेमामुळे मिळाली. विशेष म्हणजे सिनेमातील 'एक दो तीन' हे गाणं. या गाण्याने माधुरीला घराघरात पोहोचवलं. या गाण्यामुळे ती इतकी लोकप्रिय झाली की लोक तिला मोहिनी नावाने ओळखू लागले. या चित्रपटाच्या यशानंतर माधुरीला स्टारडम मिळाली. पण तिला हे यश भारतात नव्हे तर अमेरिकेत गेल्यानंतर समजलं.
अमेरिकेत मिळाली तेजाबच्या सक्सेसची माहिती
'तेजाब' चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा माधुरी तिच्या बहिणीच्या लग्नासाठी अमेरिकेत होती. तिथूनच तिला फोनवर कळलं की तिचा चित्रपट सुपरहिट ठरला आहे. ही बातमी ऐकून ती खूप आनंदी झाली.
advertisement
पहिल्यांदा चाहत्यांनी विमानतळावर ओळखलं
भारतात परतल्यानंतर माधुरी दीक्षितला पहिल्यांदाच दोन लहान मुलांनी विमानतळावर थांबवले. त्यांनी तिला "तू एक दो तीन आहेस ना?" असं विचारून ऑटोग्राफ मागितला. माधुरीने ही आठवण अनुपम खेरच्या शोमध्ये सांगितली. ती म्हणाली, "तोपर्यंत मला रस्त्यावर कोणीही थांबवत नव्हतं, पण त्या दिवशी दोन लहान मुलं माझ्या जवळ आली आणि 'एक दो तीन' म्हणत ऑटोग्राफ मागितली."
advertisement
advertisement
अनिल कपूरसोबत 'तेजाब' आणि हिट जोडी
माधुरी दीक्षितने ‘तेजाब’मध्ये अनिल कपूरसोबत काम केलं होतं. या चित्रपटामुळे त्यांची जोडी लोकप्रिय झाली. त्यानंतर त्यांनी 'पुकार' यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आणि ही जोडी बॉलिवूडमधील सर्वोत्तम जोड्यांपैकी एक ठरली.
शिफॉनच्या साडीत शूट
'द कपिल शर्मा शो'मध्ये माधुरीने आणखी एक आठवण सांगितली. तिने सांगितले की 'किस्मत से' चित्रपटातील 'तुम हमको मिले हो' हे गाणं अलास्कामध्ये -30 डिग्री तापमानात शूट करण्यात आलं. त्या थंडीमध्ये तिला शिफॉन साडी घालावी लागली आणि थंडीने व्याकुळ होऊन ती रडली होती
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 04, 2025 11:59 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
'तुम 1 2 3 हो ना', दोन मुलांनी विचारला असा प्रश्न; माधुरी दीक्षितचं संपूर्ण आयुष्यच बदलून गेलं