58ची माधुरी, 31वर्षांआधीच जुनं गाणं अन् पावसात भिजत असलेल्या माधुरीला पाहून तुम्हीही म्हणाल Age is Just A Number
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Madhuri Dixit Video : अभिनेत्री माधुरी दीक्षित आता 58 वर्षांची झाली आहे. 31 वर्षांआधीच्या जुन्या गाणं आणि पावसात भिजणाऱ्या माधुरी पाहून तुम्हीही हेच म्हणाल की, एज इज जस्ट अ नंबर. बघा एकदा व्हिडीओ.
मुंबई : मुंबईत पावसाला सुरूवात झाली. सगळीकडे वातावरण देखील रोमँटिक झालं आहे. सोशल मीडियावर देखील रोमँटिक गाणी, शेरो शायरी फीडवर यायला सुरुवात झाली आहेत. ऐकीकडे मुसळधार पाऊस कोसळत असताना सोशल मीडियावर धकधक माधुरी दीक्षितनं तिच्या अदांनी चाहत्यांच्या मनावर राज्य केलंय. अनेक वर्षांनी माधुरी तिच्या जुन्या गाण्यावर थिरकताना दिसली.
बॉलिवूडची 'धक धक गर्ल' माधुरी दीक्षित सध्या मुंबईच्या पावसाचा मनमुराद आनंद घेत आहे. नुकताच तिने आपल्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती तिच्या गाजलेल्या चित्रपटातील प्रसिद्ध गाणं 'ये मौसम का जादू है मितवा' वर डान्स करताना दिसतेय. तिचा हा व्हिडिओ चाहत्यांमध्ये प्रचंड चर्चेत आहे.
advertisement
'हम आपके हैं कौन'ची आठवण करून देणारा व्हिडिओ
या व्हिडिओत माधुरीने लाल रंगाचा प्रिंटेड को-ऑर्ड सेट घातला आहे. तिचं सौंदर्य अधिक खुलून दिसतंय. हातात छत्री घेऊन पावसाच्या सरींमध्ये ती आनंदानं नाचताना दिसतेय. 'ये मौसम का जादू है मितवा' हे गाणं ऐकून चाहत्यांना 'हम आपके हैं कौन'मधील निशा आणि प्रेमची जोडी आठवली.
advertisement
advertisement
चाहत्यांकडून कौतुकाची बरसात
व्हिडिओ शेअर करत माधुरीनं Let the magic of this season flow! असं कॅप्शन दिलं आहे. माधुरीच्या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेत. एका चाहत्यानं लिहिलंय, "हे माझं आवडतं गाणं आहे." दुसऱ्याने लिहिलं, "तुमचं हास्य खरोखर जादुई आहे, राणी!" आणखी एक युजर म्हणाला, "माधुरी दीक्षित कोणत्याही ऋतूत आपली जादू दाखवते."
advertisement
माधुरीने काही दिवसांपूर्वीच तिचा 58 वा वाढदिवस साजरा केला. याच दिवशी तिचा मुलगा अरिन याचा पदवीप्राप्ती समारंभही पार पडला होता. डॉ. श्रीराम नेने यांनी याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. सध्या माधुरी चित्रपटांसोबतच डिजिटल प्लॅटफॉर्मवरही काम करत आहे. येत्या काळात ती अनेक नव्या प्रोजेक्ट्समध्ये झळकणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 27, 2025 12:25 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
58ची माधुरी, 31वर्षांआधीच जुनं गाणं अन् पावसात भिजत असलेल्या माधुरीला पाहून तुम्हीही म्हणाल Age is Just A Number