बिग बॉस फेम अभिनेत्रीचा 'कार'नामा, दुचाकीला धडक देऊन घटनास्थळावरून पळाली; अपघाताचा CCTV VIDEO
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Divya Suresh Hit And Run : डान्सर गौतमी पाटीलच्या कारने पुण्यातील एका रिक्षा चालकाला धडक दिल्याची घटना ताजी असताना आता एका प्रसिद्ध अभिनेत्रीनं एका दुचाकीला धडक दिली. घटनेनंतर अभिनेत्रीनं घटनास्थळावरून पळ काढला आहे.
काही दिवसांआधी पुण्यात डान्सर गौतमी पाटील हिच्या कारने एका रिक्षा चालकाला धडक दिली. यात तो रिक्षाचालक गंभीर जखमी झाला. रिक्षेला धडक दिल्यानंतर कार चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. कार चालकला पोलिसांनी ताब्यात घेतलं. दरम्यान या घटनेची पुनरावृत्ती झाल्याचं पाहायला मिळतंय. बिग बॉस फेम प्रसिद्ध अभिनेत्रीनं तिच्या कारने एका दुचाकीला धडक दिली आहे. अपघातानंतर अभिनेत्री घटनास्थळावरून पळाली. हिट अँड रन विरोधात अभिनेत्रीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिव्या सुरेश असं अभिनेत्रीचं नाव असून ती कन्नड मधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. बेंगळुरूच्या ब्यतारायणपुरा परिसरात 4 ऑक्टोबर रोजी पहाटे 1:30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेचा सीसीटीव्ही समोर आला आहे. एक दुचाकीस्वार समोरून येत असतानाच अभिनेत्रीच्या कारला येऊन धडकला, अशी माहिती समोर आली आहे. दुचाकीवरून तीन जण प्रवास करत होते. तीन जण हॉस्पिटलला जात असताना ही घटना घडल्याचं सांगण्यात येत आहे.
advertisement
दुचाकी स्वाराने भटक्या कुत्र्यांपासून वाचण्यासाठी प्रयत्न करत असताना त्यांची अभिनेत्री दिव्या सुरेशच्या कारला धडक लागली, अशी माहिती समोर आली आहे. अनुषा, अनिता आणि किरण अशी दुचाकी स्वारांची नावं आहे. यात अनिता गंभीर जखमी झाली असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तिच्या गुडघ्याला जबरदस्त मार लागला असून फ्रॅक्चर झालं आहे. तर इतर दोघांना किरकोळ दुखापती झाल्याची माहिती समोर आली आहे.
advertisement
दुर्घटनेनंतर दिव्या सुरेश पळून गेल्याचं प्रत्यक्षदर्शी आणि पीडितेच्या कुटुंबीयांनी सांगितलं. पीडितेच्या चुलत भावाने सांगितले की, "आम्ही हॉस्पिटलला जात असताना, काळ्या किआ कारमधील एका महिलेने आम्हाला बयतरायणपुरा पोलीस स्टेशनजवळ धडक दिली. आम्ही तिला थांबण्यास सांगितले, परंतु ती लगेचच तेथून निघून गेली."
A former Bigg Boss Kannada contestant Divya Suresh has been identified as the driver of a hit-and-run incident reported late night on October 4 in Bengaluru,. Bengaluru traffic police identified her vehicle using CCTV footage of the accident pic.twitter.com/uScihrgMQ5
— NextMinute News (@nextminutenews7) October 25, 2025
advertisement
घटनेनंतर पोलिसांनी जखमींना शक्य तितक्या लवकर रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. पीडितेला प्रथम न्यू लाईफ हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आणि नंतर पुढील उपचारांसाठी बीजीएस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. घटनेनंतर दोन ते तीन दिवसांनी तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आणि दिव्या सुरेशची ओळख कथित चालक म्हणून पटवली.
advertisement
Weeks after a late-night hit-and-run accident in Bengaluru, the city traffic police on Friday identified ex Bigg Boss Kannada contestant Divya Suresh as the alleged driver of the car involved in the accident that left three people injured. The accident took place near Nithya… pic.twitter.com/ucoigQ6FWn
— Karnataka Portfolio (@karnatakaportf) October 24, 2025
advertisement
सीसीटीव्ही फुटेज
दुर्घटनेनंतर दिव्या सुरेशने पीडितेशी संपर्क साधला नाही किंवा कोणतीही मदत केली नाही असा कुटुंबाचा आरोप आहे. बयतरायणपुरा वाहतूक पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे आणि तपास सुरू केला आहे. वाहनाचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज वापरण्यात आले, ज्यामध्ये दिव्या सुरेश ही मालक असल्याचे ओळखले गेले आणि तपासाचा भाग म्हणून तिची कार जप्त करण्यात आली आहे.
advertisement
दिव्या सुरेश गाडी चालवत होती
सायबर गुन्हे विभागाचे पोलिस अधीक्षक अनूप शेट्टी यांनी सांगितले की, दोन्ही पक्षांनी तक्रार दाखल करण्यास उशीर केल्याने संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासात दिव्या सुरेश गाडी चालवत असल्याचे समोर आले आहे आणि पुढील तपास सुरू आहे. प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की दुचाकीवर तीन लोक होते आणि वेगामुळे अपघात झाला असावा, परंतु अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 25, 2025 12:01 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
बिग बॉस फेम अभिनेत्रीचा 'कार'नामा, दुचाकीला धडक देऊन घटनास्थळावरून पळाली; अपघाताचा CCTV VIDEO


