Shreyas Iyer : चित्त्यासारखी उडी, वेदनेने विव्हळला पण कॅच सोडला नाही! श्रेयसची अवस्था पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी! पाहा Video
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Shreyas Iyer Catch Video : ऑस्ट्रेलियाचा विकेटकीपर बॅटर अॅलेक्स कॅरीच्या हवाई शॉटनंतर तो मागे धावला आणि कॅच घेतल्यानंतर त्याचा तोल गेला.
India vs Australia 3rd ODI : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सिडनी एकदिवसीय सामन्यात भारतीय क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला. टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने चांगली सुरूवात केल्यानंतर भारतीय बॉलर्सने चांगलं कमबॅक केलं. त्यावेळी उपकर्णधार श्रेयस अय्यरला झेल घेण्याचा प्रयत्न करताना गंभीर दुखापत झाल्याचं पहायला मिळालं आहे. असंभव असा कॅच घेतल्यानंतर श्रेयस अय्यर वेदनेने विव्हळलेला दिसला. त्याचा व्हिडीओ समोर आला आहे.
बरगड्याला बॉल लागला अन्....
ऑस्ट्रेलियाचा विकेटकीपर बॅटर अॅलेक्स कॅरीच्या हवाई शॉटनंतर तो मागे धावला आणि कॅच घेतल्यानंतर त्याचा तोल गेला. जमिनीवर जोरदार पडल्यानंतर त्याच्या बरगड्याला बॉल लागला. श्रेयस अय्यर पडल्यानंतर फिजिओ मैदानात धावले. दुखापत गंभीर होती आणि त्याला खांद्यावर घेऊन मैदानाबाहेर जावे लागले. श्रेयसला तीव्र वेदना झाल्याचं पहायला मिळालं. त्याचा व्हिडीओ पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी आलंय.
advertisement
पाहा Video
Shreyas SUPERMAN Iyer!
Puts his body on the line for #TeamIndia and gets the much needed wicket. #AUSvIND 3rd ODI | LIVE NOW https://t.co/0evPIuAfKW pic.twitter.com/LCXriNqYFy
— Star Sports (@StarSportsIndia) October 25, 2025
advertisement
ऑस्ट्रेलियाचा चांगली सुरूवात
आत्तापर्यंत, टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करणाऱ्या ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार मिचेल मार्श आणि मॅट रेनशॉ यांनी चांगली खेळी केली. मार्शने 50 बॉलमध्ये 5 फोर आणि 1 सिक्ससह 41 रन केले, त्याला अक्षर पटेलने बोल्ड केले. यानंतर ट्रॅव्हिस हेडने 25 बॉलमध्ये 6 फोरच्या मदतीने 29 रनची वेगवान खेळी केली, पण तो मोहम्मद सिराजच्या बॉलवर प्रसिध कृष्णाकडे कॅच देऊन आऊट झाला. ऑस्ट्रेलियाकडून मॅट रेनशॉने सर्वाधिक 56 रन केले. तो वॉशिंग्टन सुंदरच्या बॉलवर एलबीडब्ल्यू झाला. मॅथ्यू शॉर्टने 30 रन आणि अॅलेक्स कॅरीने 24 रन करत योगदान दिलं.
advertisement
टीम इंडिया (Playing XI): रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.
ऑस्ट्रेलिया (Playing XI): मिचेल मार्श (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, मॅथ्यू शॉर्ट, मॅट रेनशॉ, ॲलेक्स कॅरी (विकेटकीपर), कूपर कॉनॉली, मिचेल ओवेन, नॅथन एलिस, मिचेल स्टार्क, ॲडम झम्पा, जोश हेझलवूड.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 25, 2025 12:13 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Shreyas Iyer : चित्त्यासारखी उडी, वेदनेने विव्हळला पण कॅच सोडला नाही! श्रेयसची अवस्था पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी! पाहा Video


