अर्जुन कपूरसोबत पुन्हा गुलूगुलूची चर्चा, 'मुन्नी' दुसऱ्याच्याच प्रेमात? मलायकासोबत तो 'मिस्ट्री मॅन' कोण?

Last Updated:

Malaika Arora Mystery Man मलायका अरोरा अर्जुन कपूरसोबत ब्रेकअपनंतर मुंबईतील एका कॉन्सर्टमध्ये मिस्ट्री मॅनसोबत दिसली. व्हिडिओ व्हायरल होत सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला.

News18
News18
बॉलीवूड अभिनेत्री मलायका अरोरा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी रिअॅलिटी शो किंवा फॅशन वॉकसाठी नाही तर एका व्हायरल व्हिडिओमुळे चर्चेत आली आहे. मलायका तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. अर्जून कपूरबरोबर ब्रेकअप झाल्यानंतर मलायका पुन्हा प्रेमात पडल्याचं दिसतंय. इन्स्टाग्रामवर दोघांचं गुलूगुलूही सुरू होतं. बर्थडेला दोघांनी एकमेकांचे फोटो पोस्ट केले होते. इतकंच काय तर इव्हेंटमध्येही दोघांनी एकमेकांना मिठी मारली होती.
अर्जुन कपूरसोबत पॅकअपच्या चर्चा सुरू असताना मलायका पुन्हा एकदा एका मिस्ट्री मॅनसोबत दिसली आहे. तो मिस्ट्री मॅन कोण आहे असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. मलायकाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
advertisement
शनिवारी रात्री मुंबईतील एमएमआरडीए ग्राउंड्सवर झालेल्या ग्रॅमी पुरस्कार विजेत्या गायक एनरिक इग्लेसियसच्या कॉन्सर्टमध्ये मलायका दिसली होती. जिथे ती एका 'मिस्ट्री मॅन'सोबत डान्स एन्जॉय करताना दिसली.
कॉन्सर्टमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ज्यामध्ये मलायका एका मिस्ट्री मॅनसोबत डान्स करत गप्पा मारताना दिसत आहे.  अर्जुन कपूरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर मलायका पुन्हा प्रेमात पडल्याच्या चर्चा या व्हिडीओनंतर सुरू झाल्या आहेत.
advertisement
कॉन्सर्टमध्ये मलायकाचा ग्लॅमरस लूकमध्ये दिसली. व्हाइट कलरच्या फिटेड टँक टॉपमध्ये मलायका बोल्ड दिसत होती. कॉन्सर्टमधील मलायकाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी मिस्ट्री मॅन कोण आहे यावर अनेक तर्क लावले आहेत. एका युझरने लिहिलंय, "शेवटी मलायकाने तिची चॉइस बदलली. एक हँडसम हंक पटवला.  अरबाज आणि अर्जुन पेक्षा हा चांगला आहे. तर काहींनी या चर्चा खोट्या असल्याचं सांगितल आहे. व्हिडीओमध्ये दिसणारा तो मिस्ट्री मॅन तिचा मॅनेजर असल्याचं म्हटलं आहे.
advertisement
advertisement

चाहत्यांनी घेतली मलायकाची बाजू

काही ट्रोलर्सनी मलायकाची बाजू घेतली आहे. एका युझरने लिहिलंय, जर 52 वर्षांचा पुरूष एखाद्या मुलीला डेट करत असेल तर काही गोंधळ होत नाही पण एका 50 वर्षांच्या महिलेने असं केलं तर ट्रोल केलं जातं.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
अर्जुन कपूरसोबत पुन्हा गुलूगुलूची चर्चा, 'मुन्नी' दुसऱ्याच्याच प्रेमात? मलायकासोबत तो 'मिस्ट्री मॅन' कोण?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement