Rupali Bhosle Car Accident : भीषण अपघातात गाडीचा चेंदामेंदा, रुपाली भोसलेने सांगितला Car Accident चा भयानक अनुभव

Last Updated:

Rupali Bhosle Car Accident : काही दिवसांपूर्वी अभिनेत्री रूपाली भोसलेच्या गाडीचा भीषण अपघात झाला होता, त्या अपघातावेळी काय घडलं, याचा थरारक अनुभव तिने नुकत्याच एका मुलाखतीत सांगितला आहे.

News18
News18
मुंबई : मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री रूपाली भोसले, जिने 'आई कुठे काय करते' मालिकेत 'संजना' ही खलनायिकेची भूमिका गाजवली, ती सध्या 'स्टार प्रवाह'वरील 'लपंडाव' मालिकेत काम करत आहे. अभिनयाच्या पलीकडे रूपाली सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांना अनेक वैयक्तिक अपडेट्स देत असते. अशातच, काही दिवसांपूर्वी तिच्या गाडीचा भीषण अपघात झाला होता, त्या अपघातावेळी काय घडलं, याचा थरारक अनुभव तिने नुकत्याच एका मुलाखतीत सांगितला आहे.

रूपाली भोसलेने सांगितला अपघाताचा 'तो' प्रसंग

'मराठी मनोरंजनविश्व' या यूट्यूब वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत रूपाली भोसलेने अपघाताचा तो प्रसंग सांगितला. "हा अपघात घोडबंदर रोडवर झाला. माझ्या पुढे एक कंटेनर होता आणि मी त्याच्या अगदी मागे होते. गंमत म्हणजे, माझ्यामागेही आणखी एक कंटेनर होता!"
हा प्रसंग सांगताना रूपाली म्हणाली की, "माझ्या मागचा कंटेनर ज्या वेगात येत होता, ते बघता वेगळे काहीतरी घडले असते. पण लकीली, पुन्हा एकदा स्वामींची कृपा झाली, तो कंटेनर तेवढ्या जोरात आला नाही. माझ्यावर जे मोठे संकट येणार होते, ते त्या गाडीने घेतले, असा तो किस्सा झाला."
advertisement
advertisement

कष्टाच्या गाडीचे नुकसान पाहून वाईट वाटले!

या अपघातात जीवितहानी झाली नसली तरी गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. रूपालीने भावना व्यक्त करताना सांगितले, "गाडी तर दुरुस्त होऊन येईल. पण खूप वाईट वाटले, कारण ती कष्टाने घेतलेली 'ड्रीम कार' होती. आपण कोणतीही छोटी गोष्ट जरी मेहनतीने घेतली आणि तिला काही झाले, तरी खूप वाईट वाटते."
advertisement
advertisement

स्वामींमुळे थोडक्यात वाचले

या घटनेनंतर रूपालीने आपल्या आयुष्यात श्री स्वामी समर्थांचे स्थान किती महत्त्वाचे आहे, हे सांगितले. ती म्हणाली, "स्वामींचे माझ्या आयुष्यात खूप महत्त्व आहे. माझी आई स्वामीभक्त आहे, तिची नित्य पारायणे असतात आणि ती त्यांचे मुकुट स्वतः बनवते. आपल्या आयुष्यात ज्या पद्धतीने सगळ्या गोष्टी घडतात, ते सर्व त्यांना माहीत असते. स्वामींच्या कृपेचे असे असंख्य अनुभव माझ्या आयुष्यात आहेत." कंटेनरच्या धडकेतून थोडक्यात बचावल्यामुळे रूपालीने पुन्हा एकदा स्वामी समर्थांच्या कृपेचे आभार मानले.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
Rupali Bhosle Car Accident : भीषण अपघातात गाडीचा चेंदामेंदा, रुपाली भोसलेने सांगितला Car Accident चा भयानक अनुभव
Next Article
advertisement
Crime-Thriller ची मेजवानी! Prime Video वर पाहा 'या' 7 दमदार सीरीज; शेवटची तर मस्ट वॉच
Crime-Thriller ची मेजवानी! Prime Video वर पाहा 'या' 7 दमदार सीरीज
    View All
    advertisement