'माझ्या जवळच्या लोकांनीचं…' सुदेश भोसलेंनी सांगितला वाईट काळातील 'तो' अनुभव!

Last Updated:

Dubbing Artist Sudesh Bhosale: 1988 पासून सुदेश भोसले यांनी प्रोफेशनल डबिंग आर्टिस्ट म्हणून त्यांच्या कामाची सुरुवात केली. अमिताभ बच्चन यांची मिमिक्री असो किंवा कोणत्या चित्रपटाचं डबिंग कलाकारांचा हुबेहूब आवाज काढण्याची कला त्यांना अवगत आहे.

News18
News18
मुंबई: 'आवाज' ही देवाने दिलेली देणगी आहे असं म्हणतात आणि आपल्या याच आवाजासाठी प्रसिद्ध असलेले सुदेश भोसले हे एक भारतीय पार्श्वगायक आहेत. त्यांनी आतापर्यंत अनेक मराठी आणि बॉलीवूड चित्रपटांसाठी पार्श्वगायन केले आहे. पण ते मुख्यतः ओळखले गेले आणि जातात ते अमिताभ बच्चन यांच्या आवाजाची हुबेहूब नक्कल करण्याच्या क्षमतेसाठी.
पार्श्वगायनातील मोठा ब्रेक…
आपल्या आवाजाचा त्यांनी पुरेपूर वापर केला. डबिंग किंवा मिमिक्री आर्टिस्ट म्हणून त्यांनी मराठी आणि हिंदी या दोन्ही क्षेत्रात स्वतःच्या कामाचा आणि नावाचा ठसा उमटवला. त्यांना त्यांच्या पार्श्वगायनातील पहिला मोठा ब्रेक जलजला या चित्रपटामुळे मिळाला. संजीव कुमार, अनिल कपूर यांसारख्या अनेक कलाकारांना त्यांनी पार्श्वगायनात आणि डबिंगसाठी आवाज दिला. 'प्रोफेसर की पडोसन' हा चित्रपट पूर्ण करण्याआधीच संजीव कुमार यांचे अकाली निधन झाले, त्यांनतर संजीव कुमार यांच्या आवाजात सुदेश भोसले यांनी डबिंग करत हा चित्रपट पूर्ण केला.
advertisement
डिप्रेशन आणि हे माझं काय चालायं असे प्रश्न…
काही दिवसांपूर्वी लोकमत फिल्मी या मराठी युट्यूब चॅनेलला सुदेश भोसले यांनी मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या आयुष्यातील रफ फेजचा उल्लेख केला. ते म्हणाले, 'एक काळ असा आला की, मला माझा जवळच्या लोकांनीच विचारलं की तू दुसऱ्यांच्या आवाजात अजून किती गाणारं? तुझी आयडेंटिटी काय आहे? तेव्हा थोडासा एक रफ फेज आला, फ्रस्ट्रेशन, डिप्रेशन आणि नेगेटिव्हिटी आली. आणि मलाच प्रश्न पडला की, हे माझं काय चालयं… पुढे त्यांनी सांगितलं, त्यानंतर मी काही वेळा स्वतःच्या आवाजात गायाला सुरुवात केली, पण लोकांनी माझा आवाज स्वीकारला नाही, त्यांना काही वेगळं हवं होतं.
advertisement
'उपरवाला तेरी गाडी चला रहा है…'
या मुलाखतीत त्यांनी सांगितलं की, या नंतर मी आनंदजी कल्याणजी यांच्याकडे गेलो आणि त्यांना सांगितलं की, असं असं आहे, तेव्हा ते म्हणाले, सुदेश इथे गप्प बसं, मला सांग आपल्या भारतात तुझ्यासारखे असे किती आहेत, तेव्हा मी म्हणालो, मला नाही माहिती. यावर आनंदजी म्हणाले तु एकचं आहेस, "उपरवाला तेरी गाडी चला राहा है, तो चलाने दे" लोकांना जे हवं आहे ते दे, आणि त्या नंतर मी यातून बाहेर आलो, असं सुदेश भोसले यांनी सांगितलं. संजीव कुमार यांच्या अकाली निधनानंतर 5 चित्रपट माझ्याकडे डबिंगसाठी आले. अनिल कपूर यांचा तेजाब हा चित्रपटातील काही भाग देखील मी तेव्हा डब केला होता असं त्यांनी सांगितलं.
advertisement
कोण आहेत सुदेश भोसले?
मिमिक्री आर्टिस्ट म्हणून ओळखले जाणारे सुदेश भोसले हे पार्श्वगायक आणि डबिंग आर्टिस्ट आहेत. 1988 पासून त्यांनी प्रोफेशनल डबिंग आर्टिस्ट म्हणून त्यांच्या कामाची सुरुवात केली. अमिताभ बच्चन यांची मिमिक्री असो किंवा कोणत्या चित्रपटाचं डबिंग कलाकारांचा हुबेहूब आवाज काढण्याची कला त्यांना अवगत आहे. आपल्या या आगळ्यावेगळ्या कलेच्या जोरावर त्यांनी या कलाक्षेत्रात स्वतःच नाव कमावलं आणि लोकांच्या मनात स्वतःचं स्थान निर्माण केलं.
मराठी बातम्या/मनोरंजन/
'माझ्या जवळच्या लोकांनीचं…' सुदेश भोसलेंनी सांगितला वाईट काळातील 'तो' अनुभव!
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement