OTT Top Trending : थिएटरमध्ये घातला राडा, आता ओटीटीवरही केला कब्जा, रिलीज होताच सिनेमा नंबर वन ट्रेंड..!
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
OTT Top Trending : ओटीटीवर एकापाठोपाठ वेब सिरीज आणि मूव्ही रिलीज होत असतात. यातील काही सिनेमे थिएटरमध्ये चालले नाही तर ओटीटीवर चालतात.
मुंबई : ओटीटीवर एकापाठोपाठ वेब सिरीज आणि मूव्ही रिलीज होत असतात. यातील काही सिनेमे थिएटरमध्ये चालले नाही तर ओटीटीवर चालतात. तर काही थिएटर आणि ओटीटी सगळीकडेच कब्जा करतात. असाच एक सिनेमा जो थिएटरमध्ये तर गाजलाच आता तो ओटीटीवर रिलीज झालाय. ओटीटीवरही तो धुमाकूळ घालत नंबर वन ट्रेंड करत आहे.
या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाई करत अनेक विक्रम रचले. आता तो OTT वर आपली जादू दाखवत आहे. आम्ही अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' चित्रपटाबद्दल बोलत आहोत, जो आता OTT प्लॅटफॉर्मवरही ट्रेंडिंग आहे. बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केल्यानंतर, चित्रपटाने तुफान डिजिटल स्ट्रीमिंग देखील केले आहे आणि ट्रेंडमध्ये आहे.
advertisement
'पुष्पा 2' थिएटरमध्ये रिलीज झाल्यापासून धडाधड कमाई करत आहे. चित्रपटातील अल्लू अर्जुनचे संवाद, ॲक्शन सीन आणि दमदार अभिनयाने चाहत्यांमध्ये वेडं केलं. आता हा चित्रपट OTT वर प्रदर्शित झाला आहे, चाहत्यांना तो कुठेही, कधीही पाहण्याचा आनंद मिळत आहे, ज्यामुळे त्याची लोकप्रियता आणखी वाढली आहे.
सुकुमार दिग्दर्शित आणि अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना स्टारर 'पुष्पा 2: द रुल' गेल्या 50 दिवसांपासून भारतीय बॉक्स ऑफिसवर राज्य करत आहे. या चित्रपटाने आतापर्यंत भारतात सुमारे 1230.55 कोटी रुपयांची कमाई केली आहे, तर जागतिक कलेक्शन 1800 कोटी रुपये पार केले आहे. IMDb च्या अलीकडील रँकिंगनुसार, अल्लू अर्जुनने 'भारतीय चित्रपटातील टॉप 25 सर्वाधिक लोकप्रिय सुपरस्टार्स'च्या यादीत पहिले स्थान मिळवले आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 01, 2025 1:47 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
OTT Top Trending : थिएटरमध्ये घातला राडा, आता ओटीटीवरही केला कब्जा, रिलीज होताच सिनेमा नंबर वन ट्रेंड..!