जिने नजर काढली ती कायमची नजरेपासून दूर गेली, अल्लू अर्जुनच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीचं निधन

Last Updated:

Allu Arjun : पुष्पा 2 प्रीमियर वेळी झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणात जेलमधून घरी आल्यानंतर जिनं अल्लू अर्जुनची नजर काढली होती ती व्यक्ती आता अल्लूच्या नजरेपासून कायमची दूर गेली आहे. 

News18
News18
मुंबई : पुष्पा स्टारर अल्लू अर्जुन सध्या त्याच्या नव्या सिनेमाच्या शूटींगमध्ये बिझी आहे. काही महिन्यांआधी पुष्पा 2मुळे अल्लू अर्जुन वादात आला होता. पुष्पा 2 प्रीमियरच्या वेळी झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणात एका महिलेचा मृत्यू झाला. ज्यामुळे अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली होती. अल्लू अर्जुनच्या या कठीण काळात त्याच्या कुटुंबीयांंनी त्याची लाखमोलाची साथ दिली होती. या प्रकरणात जेलमधून घरी आल्यानंतर जिनं अल्लू अर्जुनची नजर काढली होती ती व्यक्ती आता अल्लूच्या नजरेपासून कायमची दूर गेली आहे.
सर्वत्र गणेशोत्सवाचा आनंद आहे. अशातच पुष्पा स्टार अल्लू अर्जुन आणि त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अल्लू अर्जुनच्या कुटुंबात एक दुःखद घटना घडली आहे. अल्लू अर्जुनची आजी अल्लू कनकरत्नम यांचे शनिवारी 30 ऑगस्ट रोजी वयाच्या 94 व्या वर्षी निधन झालं. आजीचं पार्थिव अल्लू अरविंदच्या घरी आणण्यात आलं आहे. आज दुपारी कोकापेट येथे त्यांच्यांवर अंतिम संस्कार केले जाणार आहेत.
advertisement
आजीच्या निधना झालं तेव्हा अल्लू अर्जुन मुंबईत होता. ही दुःखद बातमी मिळताच त्यानं आपली सगळी काम आणि कार्यक्रम रद्द करून तो तात्काळ हैदराबादला रवाना झाला.
अल्लू अर्जुनचा चुलत भाऊ राम चरणही त्यावेळी हैदराबादमध्ये उपस्थित नव्हता. तो म्हैसूरमध्ये दिग्दर्शक बुची बाबू सना यांच्या 'पेड्डी' चित्रपटाचे शूटिंग करत होता. पण आजीच्या मृत्यूची बातमी कळताच त्यानं देखील शूटींग थांबवलं आणि हैदराबादला परतण्याचा निर्णय घेतला.
advertisement

आज अंत्यसंस्कार 

मीडिया रिपोर्टनुसार,  अल्लू कंकररत्नम यांचे शनिवारी पहाटे 1.45 वाजता वृद्धापकाळाशी संबंधित आजारांमुळे हैदराबाद येथील त्यांच्या निवासस्थानी निधन झालं. असं सांगितले जात आहे की, चिरंजीवी सध्या अल्लू अरविंद यांच्यासोबत आहेत आणि अंत्यसंस्काराची तयारी करत आहेत. यावेळी पवन कल्याण आणि नागा बाबू एका सार्वजनिक कार्यक्रमासाठी विशाखापट्टणमला गेले आहेत. ते उद्या कुटुंबाला भेट देऊन श्रद्धांजली वाहणार आहेत.
advertisement
Allu Arjun's grandmother does the Drishti ritual to remove negative energy.#AlluArjun #AlluArjun
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
जिने नजर काढली ती कायमची नजरेपासून दूर गेली, अल्लू अर्जुनच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीचं निधन
Next Article
advertisement
Gold Price Prediction: सोन्याच्या बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ चीच पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवणारा अंदाज
सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण
  • सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण

  • सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण

  • सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण

View All
advertisement