वडील ऋषी कपूरच्या हिरोईनसोबत रणबीरने मारले ठुमके, हिट झाला डान्स नंबर; 326 मिलियन व्यूज

Last Updated:

रणबीर कपूर हा बॉलिवूडमधील सर्वात चार्मिंग आणि प्रतिभावान अभिनेत्यांपैकी एक आहे. अभिनयात तर तो माहिर आहेच, पण नृत्याच्याही बाबतीत त्याची तोड नाही.

वडील ऋषी कपूरच्या हिरोईनसोबत रणबीरने मारले ठुमके
वडील ऋषी कपूरच्या हिरोईनसोबत रणबीरने मारले ठुमके
मुंबई :  रणबीर कपूर हा बॉलिवूडमधील सर्वात चार्मिंग आणि प्रतिभावान अभिनेत्यांपैकी एक आहे. अभिनयात तर तो माहिर आहेच, पण नृत्याच्याही बाबतीत त्याची तोड नाही. त्याच्या प्रत्येक गाण्यात एक खास ऊर्जा दिसते. पण तुम्हाला माहीत आहे का, रणबीरने आपल्या वडिलांचे म्हणजेच ऋषी कपूर यांच्या काळातील एका सुपरहिट अभिनेत्रीबरोबर ठुमके लगावले आणि ते गाणं ब्लॉकबस्टर ठरलं.
रणबीर कपूरने ठुमके लगावलेली ऋषी कपूर यांची ही हिरोईन दुसरी तिसरी कोणी नसून ‘धक धक गर्ल’ माधुरी दीक्षित आहे. 2023 मध्ये आलेल्या "ये जवानी है दिवानी" या सुपरहिट चित्रपटात त्यांनी एकत्र स्क्रीन शेअर केली होती. या चित्रपटातल्या 'घाघरा' या आयटम सॉंगमध्ये दोघांनी एकत्र थिरकून सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. या गाण्यातील रणबीर आणि माधुरीची केमिस्ट्री पाहून प्रेक्षक अक्षरशः थक्क झाले होते.
advertisement
“घाघरा” हे गाणं रिलीज झाल्यापासून त्याची क्रेझ कधी कमी झालीच नाही. रेखा भारद्वाज आणि विशाल दादलानी यांच्या आवाजातील हे गाणं तर गीतकार अमिताभ भट्टाचार्य यांनी लिहिलेले बोल लोकांच्या पसंतीस उतरले. या गाण्याने रिलीजनंतर तब्बल 12 वर्षांनीही आपली लोकप्रियता कायम ठेवली आहे. आज या गाण्याला 326 दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत आणि अजूनही वाढत आहेत.
advertisement
दरम्यान, रणबीरच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर तो शेवटचा 2023 मध्ये आलेल्या “अ‍ॅनिमल” मध्ये दिसला होता, ज्याने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. आता तो नितीश तिवारीच्या “रामायण” या बहुचर्चित चित्रपटात प्रभू रामाची भूमिका साकारणार आहे, जो 2026 च्या दिवाळीत रिलीज होणार आहे.
मराठी बातम्या/मनोरंजन/
वडील ऋषी कपूरच्या हिरोईनसोबत रणबीरने मारले ठुमके, हिट झाला डान्स नंबर; 326 मिलियन व्यूज
Next Article
advertisement
Shweta Tiwari: बोल्डनेसमध्ये लेकीला देते टक्कर, श्वेता तिवारी पलकपेक्षा किती मोठी? वयाचा फरक वाचून बसेल धक्का!
बोल्डनेसमध्ये लेकीला देते टक्कर, श्वेता तिवारी पलकपेक्षा किती मोठी?
    View All
    advertisement