मुरलीधर अभिमान सराफ अँड सन्स सुवर्ण पेढीचा मदतीचा हात, अभिनेते श्यामसुंदर राजपूत यांच्या हस्ते 15 विद्यार्थिनींना सायकल प्रदान
- Published by:Sachin S
Last Updated:
ग्रामीण भागातील हुशार विद्यार्थिनींच्या उच्च शिक्षणात खंड पडू नये या हेतूने इ .९ वीत शिकणाऱ्या १५ हुशार मुलींची निवड करून त्यांना अभिनेते श्यामसुंदर राजपूत यांच्या हस्ते समारंभपूर्वक सायकल भेट देण्यात आली.
पाचोरा : ' अहिराणी या माझ्या बोलीभाषेने मला आत्मविश्वास दिला, ओळख मिळवून दिली. त्यामुळे शिक्षणाबरोबरच वेगवेगळी कौशल्ये आत्मसात केली तर आज ही बक्षिस मिळालेली सायकल विद्यार्थिनींना वेगाने यशाच्या मार्गावर नेईल " असं प्रतिपादन प्रसिद्ध हास्य अभिनेते श्यामसुंदर राजपूत यांनी केलं. मे.मुरलीधर अभिमान सराफ अँड सन्स पिंपळगावकर या मूळ पेढीच्या नव्या शोरूमच्या पहिल्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी आमदार किशोरआप्पा पाटील हेही प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
मुरलीधर अभिमान सराफ सुवर्ण पेढीने विविध शाळांमधील पंधरा गुणवान, होतकरू विद्यार्थिनींना सायकल सप्रेम भेट देऊन सामाजिक बांधिलकीचा वेगळा आदर्श प्रस्थापित केला. ग्रामीण भागातील हुशार विद्यार्थिनींच्या उच्च शिक्षणात खंड पडू नये या हेतूने इ .९ वीत शिकणाऱ्या १५ हुशार मुलींची निवड करून त्यांना अभिनेते श्यामसुंदर राजपूत यांच्या हस्ते समारंभपूर्वक सायकल भेट देण्यात आली.
advertisement
या विद्यार्थिनींना सायकल वाटप
१)कु.अवनी प्रशांत शिरोडे
(पी.के.शिंदे हायस्कूल पाचोरा)
२)कु .सुहाना सुभानशहा फकीर
( नवजीवन विद्यालय,पाचोरा)
३) कु. सायली संजय जगताप
(गो.से. हायस्कूल,पाचोरा)
४) कु. पुर्वी मनोज सोनवणे
(गो.से. हायस्कूल,पाचोरा)
५) कु. नम्रता भीमराव महेराव
(निर्मलाताई दत्तात्रय तावरे माध्यमिक विद्यालय,पाचोरा)
६) कु.स्वाती प्रमोद पाटील
(जागृती माध्यमिक विद्यालय, पाचोरा)
७) कु.अक्षरा संदीप धनगर (मिठाबाई कन्या माध्यमिक विद्यालय,पाचोरा)
advertisement
८) कु.दक्षता भाऊसाहेब पाटील
(लाडकूबाई माध्यमिक विद्यालय, भडगाव)
९) कु. अंजली साहेबराव शिंदे
(सुमनताई गिरधर पाटील माध्यमिक विद्यालय, भडगाव)
१०) रोहिणी भगवान माळी
(आदर्श कन्या विद्यालय, भडगांव)
११) कु.चैताली दलपत राजपूत
(सरदार के.एस.पवार माध्यमिक विद्यालय,नगरदेवळा)
१२) कु.योगिता सुधाकर पाटील
( समाज विकास विद्यालय,शिंदाड)
१३) कु.सपना वजीर तडवी
( पी.डी.बडोला माध्यमिक विद्यालय,वरखेडी)
advertisement
१४) कु .अस्मिता गौतम बाविस्कर (एच.बी.संघवी हायस्कूल,खेडगाव नंदीचे)
या विद्यार्थिनींचा समावेश होता.
या कार्यक्रमात स्वागत पेढीचे संचालक मयुर सराफ यांनी तर प्रास्ताविक अदिती मयुर सराफ यांनी केलं. अभिनेते श्यामसुंदर राजपूत यांचा सत्कार रवींद्र आबा सराफ, मयुर सराफ आणि निर्मल सराफ यांनी केला तर यावेळी आवर्जून उपस्थित असलेले मान्यवर आमदार किशोरआप्पा पाटील, नानासाहेब संजय ओंकार वाघ, बापूसाहेब विष्णू महादुशेठ सोनार यांचा सत्कार रवींद्र आबा सराफ यांनी तर सुवर्णाताई महाजन यांचा सत्कार अदिती मयुर सराफ यांनी केला. तर, सपना तडवी, दक्षता पाटील आणि अक्षरा धनगर या विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केलं. कार्यक्रमाचे संयोजन - सूत्रसंचालन आनंद क्षेमकल्याणी यांनी तर आभार प्रदर्शन दिवाकर चौधरी यांनी केले.या कार्यक्रमाला पालकवर्ग, शिक्षकवृंद आणि ग्राहक उपस्थित होतं.
Location :
Jalgaon,Jalgaon,Maharashtra
First Published :
October 08, 2025 7:57 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मुरलीधर अभिमान सराफ अँड सन्स सुवर्ण पेढीचा मदतीचा हात, अभिनेते श्यामसुंदर राजपूत यांच्या हस्ते 15 विद्यार्थिनींना सायकल प्रदान