दिवाळीआधी मागावले ऑनलाईन अंजीर, डबा उघडला अन् घरात एकच आरडाओरड सुरू
- Published by:Prachi Amale
- Reported by:SURESH JADHAV
Last Updated:
ऑनलाईन मागवलेल्या ड्रायफ्रूट अंजीरच्या पॅकमध्ये अक्षरशः अळ्या आणि किडे निघाल्याने संपूर्ण कुटुंबच हादरून गेले आहे.
बीड : ऑनलाईन खरेदीमुळे अनेक सोयी उपलब्ध झाल्या असल्या तरी त्यातून काही धोकादायक प्रकारही समोर येत आहेत. अशाच प्रकाराचा एक धक्कादायक अनुभव बीडच्या पाटोदा शहरातील अॅडव्होकेट सय्यद आशरफ यांना आला. त्यांनी ऑनलाईन मागवलेल्या ड्रायफ्रूट अंजीरच्या पॅकमध्ये अक्षरशः अळ्या आणि किडे निघाल्याने संपूर्ण कुटुंबच हादरून गेले आहे.
अॅडव्होकेट सय्यद आशरफ यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या मुलाने दिनांक 23 सप्टेंबर रोजी ॲमेझॉन या ऑनलाईन शॉपिंग अॅपवरून ड्रायफ्रूट अंजीरचा एक डबा मागवला होता. या वस्तूसाठी त्यांनी 464 रुपये ऑनलाईन पेमेंट केले होते. त्यानंतर दिनांक 7 ऑक्टोबर रोजी हा पॅक घरपोच प्राप्त झाला. “मी आणि माझ्या मुलाने पॅक उघडला असता त्यामध्ये अक्षरशः अळ्या हालचाल करत असल्याचे स्पष्ट दिसले. हे पाहून आम्ही अवाक झालो. जर हा पदार्थ आमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याने किंवा लहान मुलांनी खाल्ला असता, तर फूड पॉइजनिंगसारखी गंभीर स्थिती उद्भवू शकली असती, अशी प्रतिक्रिया सय्यद यांनी दिली.
advertisement
ग्राहकांच्या आरोग्यास गंभीर धोका
यानंतर त्यांनी तत्काळ कंपनीच्या कस्टमर केअर विभागाशी संपर्क साधून ही बाब कळवली, मात्र कंपनीकडून फक्त दिलगिरी व्यक्त करण्यात आली आणि कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही, असेही त्यांनी सांगितले. या गंभीर निष्काळजीपणामुळे ग्राहकांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण झाला असून, ऍडव्होकेट सय्यद यांनी यासंदर्भात फूड सेफ्टी विभाग व ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे तक्रार दाखल करणार आहेत.
advertisement
खाद्यपदार्थांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह
या घटनेमुळे ऑनलाईन खाद्यपदार्थांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. कुणीही जबाबदारी घ्यायला तयार नाहीये आणि अशा या प्रकारामुळे जर एखाद्या लहान मुला त्याला त्रास झाला तर जबाबदारी कोण घेणार असा सवाल उपस्थित होत आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
October 08, 2025 8:12 PM IST