Ashish Kapoor Arrested: वॉशरूममध्ये केला बलात्कार, साथ फेरे फेम अभिनेत्याला पुण्यात अटक, टीव्ही इंडस्ट्रीमध्ये खळबळ

Last Updated:

छोट्या पडद्यावर साथ फेरे नावाच्या मालिकेमध्ये काम करणाऱ्या अभिनेता आशिष कपूरला अटक करण्यात आली आहे. 

News18
News18
पुणे: छोट्या पडद्यावर साथ फेरे नावाच्या मालिकेमध्ये काम करणाऱ्या अभिनेता आशिष कपूरला अटक करण्यात आली आहे.  दिल्ली पोलिसांनी पुण्यातून टीव्ही अभिनेता आशिष कपूरला अटक केली आहे. एका महिलेनं त्याच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे. ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात दिल्लीत झालेल्या एका घरगुती पार्टीदरम्यान कपूरने तिच्यावर जबरदस्ती केल्याचं पीडित महिलेनं आरोप केला आहे. आशिष कपूरला अटक झाल्यामुळे टीव्ही इंडस्ट्रीमध्ये खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आशिष कपूरने टीव्ही मालिकांमध्ये काम केलं आहे.  पीडिता आणि 'साथ फेरे' फेम अभिनेता आशिष कपूर यांची सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर भेट झाली. संभाषणानंतर दोघांमध्ये मैत्री वाढली आणि नंतर भेटीगाठी सुरू झाल्या. ऑगस्ट २०२५ च्या दुसऱ्या आठवड्यात दिल्लीतील एका घरात पार्टी आयोजित करण्यात आली होती. आशिष कपूर त्याच्या मित्रांसह या पार्टीत उपस्थित होता.
advertisement
वॉशरूममध्ये बलात्कार केला, पीडितेचा आरोप
एफआयआरमध्ये नोंदवलेल्या जबाबानुसार, पार्टी दरम्यान, पीडिता वॉशरूममध्ये गेली, जिथे आशिष कपूर आधीच उपस्थित होता. त्याने  तिथे तिच्यावर बलात्कार केला. एवढंच नाहीतर घटनेदरम्यान व्हिडिओग्राफी देखील करण्यात आली होती, परंतु आतापर्यंत पोलिसांना असे कोणतेही व्हिडिओ पुरावे सापडलेले नाहीत.
मित्रांची नावंही आली समोर
सुरुवातीला, नोंदवलेल्या एफआयआरमध्ये आशिष कपूर, त्याचा एक मित्र, मित्राची पत्नी आणि इतर दोन अज्ञात लोकांची नावं होती. परंतु, नंतर पीडितेनं तिचं म्हणणं बदललं आणि सांगितलं की, फक्त आशिष कपूरने तिच्यावर बलात्कार केला. या बदलानंतर, तपासाचे केंद्र आता पूर्णपणे आशिष कपूरवर आले आहे.
advertisement
मारहाणीचा आरोप 
जेव्हा ती वॉशरूममधून बाहेर पडली तेव्हा आशिष कपूरच्या मित्राच्या पत्नीने तिला मारहाण केली. दिल्ली पोलिसांचं म्हणणं आहे की, पार्टीनंतर तणावाची परिस्थिती निर्माण झाली आणि त्यावेळी आशिष कपूरच्या मित्राच्या पत्नीने पीसीआर कॉल करून पोलिसांना फोन केला.
आशिषला पुण्यातून अटक
दिल्ली पोलिसांनी तपास पुढे नेला आणि आशिष कपूरला पुण्यातून अटक केली. अटकेनंतर त्याला दिल्लीला आणण्यात आले आणि न्यायालयात हजर करण्यात आलं. वैद्यकीय आणि इलेक्ट्रॉनिक पुरावे गोळा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेचा जबाब कोर्टात कलम १६४ सीआरपीसी अंतर्गत नोंदवला जाईल. पार्टीमध्ये उपस्थित असलेल्या इतर लोकांचीही चौकशी केली जाईल. कथित व्हिडिओग्राफीची चौकशी करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त केली जाऊ शकतात. पार्टीमध्ये आणखी कोण उपस्थित होते आणि काय घडले हे जाणून घेण्यासाठी आशिष कपूर यांची चौकशी केली जाईल.
मराठी बातम्या/मनोरंजन/
Ashish Kapoor Arrested: वॉशरूममध्ये केला बलात्कार, साथ फेरे फेम अभिनेत्याला पुण्यात अटक, टीव्ही इंडस्ट्रीमध्ये खळबळ
Next Article
advertisement
OTT Trending: ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन, 2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने, ओटीटीवर वर 4 कपलची कहाणी हिट
ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन,2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने,OTT ट्रेंडिंग
    View All
    advertisement