रश्मिकासाठी गुडघ्यावर बसला 'सिकंदर' सलमान, ‘जोहरा जबीं’ म्हणत केलं इंप्रेस, पाहा ट्रेंडिंग व्हिडीओ
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Sikander Zohra Jabeen Song: सलमान खान आणि रश्मिका मंदान्नाचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'सिकंदर' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
मुंबई : सलमान खान आणि रश्मिका मंदान्नाचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'सिकंदर' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातून सलमान आणि रश्मिका पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करत असल्याने चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. नुकतेच प्रदर्शित झालेले या चित्रपटातील पहिले गाणे 'जोहरा जबीं' सोशल मीडियावर तुफान गाजत आहे.
'जोहरा जबीं' हे गाणे प्रदर्शित होताच चाहत्यांनी डोक्यावर घेतले आहे. रिलीजच्या अवघ्या 12 तासांतच गाण्याला 13 लाख व्ह्यूज मिळाले असून आतापर्यंत 13 कोटींहून अधिक व्ह्यूज गाण्याला मिळाले आहेत. सलमानच्या स्वॅगसोबत रश्मिकाचा दिलखेचक अंदाज प्रेक्षकांना प्रचंड भावला आहे. त्यांच्या केमिस्ट्रीलाही प्रेक्षकांकडून उदंड प्रतिसाद मिळत आहे.
किसिंग सीनमध्ये अभिनेता झाला आऊट ऑफ कंट्रोल, अभिनेत्रीला रक्तबंबाळ करुन सोडलं
हे गाणे प्रीतमने संगीतबद्ध केले असून अमिताभ भट्टाचार्य यांनी लिहिले आहे. नकाश अजीज आणि देव नेगी यांनी हे गायलं आहे. सिकंदरमधील हे सलमान रश्मिकाचं गाणं ट्रेंडिंगमध्ये आहे.
advertisement
चित्रपटाच्या टीझरमध्ये जबरदस्त अॅक्शन सीन्स पाहायला मिळाले होते. आता 'जोहरा जबीं' या गाण्यामुळे चित्रपटाचा रोमँटिक अँगलही समोर आला आहे. गाण्यातील लोकेशन्स, सिनेमॅटोग्राफी, कोरिओग्राफी आणि गायकांचे आवाज यामुळे हे गाणे अधिकच खास झाले आहे.
advertisement
'सिकंदर' हा चित्रपट यंदाच्या ईदला प्रदर्शित होणार आहे. ईदला सलमानचे चित्रपट प्रदर्शित होऊन ते ब्लॉकबस्टर ठरण्याची परंपरा आहे. त्यामुळे यावेळीही सलमानचा 'सिकंदर' प्रेक्षकांना थिएटरकडे खेचून नेईल यात शंका नाही. 'जोहरा जबीं' या गाण्याने दिलेल्या उत्साहा नंतर आता सर्वांना चित्रपटाच्या प्रदर्शनाचीच प्रतीक्षा आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 05, 2025 7:44 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
रश्मिकासाठी गुडघ्यावर बसला 'सिकंदर' सलमान, ‘जोहरा जबीं’ म्हणत केलं इंप्रेस, पाहा ट्रेंडिंग व्हिडीओ








