दादाच नाहीत, 'शिंदेंना आत घेऊन या' कोण म्हणणार! अंतिम दर्शन हुकलं, आनंद शिंदेना अश्रू अनावर
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Anand Shinde on Ajit Pawar Death : प्रचंड गर्दीमुळे अनेकांना अजित दादांचं अंतिम दर्शन घेता आलं नाही. प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांनाही अजित दादांना शेवटचं पाहता आलं नाही.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र दु:खात बुडाला आहे. त्यांच्यावर बारामती या त्यांच्या मुळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारासाठी लाखोंच्या संख्येने लोकांची गर्दी झाली. राजकारणासह कला, साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी अंतिम दर्शनासाठी हजेरी लावली. प्रचंड गर्दीमुळे अनेकांना दादांचं अंतिम दर्शन घेता आलं नाही. प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांनाही अजित दादांना शेवटतं पाहता आलं नाही. अक्षरश: अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
अंत्यसंस्कारस्थळी उपस्थित असताना आनंद शिंदे म्हणाले, "मला आता काही सुचत नाहीये. इतकी गर्दी आहे की मीसुद्धा आतमध्ये जाऊ शकलो नाही. हीच खेदाची गोष्ट आहे की इथे येऊन दादांना फक्त लांबून पाहिलं. त्यांचं दर्शन घेणंही शक्य झालं नाही."
advertisement
आनंद शिंदे आणि अजित पवार यांचे अनेक वर्षांचे चांगले आणि मैत्रीपूर्ण संंबंध होते. अनेक वर्षांपासून ते एकमेकांच्या संपर्कात होते. आनंद शिंदे म्हणाले, "ज्या दादांसोबत मी बसलो, उठलो... कुणाचं काही काम असलं की मी डायरेक्ट दादांना फोन करायचो. ते नेहमी म्हणायचे, 'ए शिंदेंना घेऊया. पण आज दादाच तिथे नाहीत म्हटल्यावर मला कोण फोन करून आतमध्ये घेणार?"
advertisement
राजकीय असो सामाजिक किंवा कलाविश्वात दादा सगळ्यांचे प्रिय होते. दादांचा लाडका अभिनेता सूरज चव्हाणही शेवटचं दर्शन घेण्यासाठी पोहोचला होता. मात्र त्यालाही दादांना पाहता आलं नाही. सूरजनं दादांच्या जळच्या चितेसमोर डोकं टेकवलं.
बारामतीमध्ये अजित पवारांसाठी आज लाखोंचा जनसमुदाय लोटला होता. प्रत्येकासाठी आपुलकीनं फोन उचलणारे, कामात मदत करणारे आणि माणसांशी नातं जपणाऱ्या दादांना निरोप देताना प्रत्येकाचा कंठ दाटून आला होता. दादांच्या जाण्याने निर्माण झालेली ही पोकळी कधीच न भरून निघणारी आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 29, 2026 6:17 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
दादाच नाहीत, 'शिंदेंना आत घेऊन या' कोण म्हणणार! अंतिम दर्शन हुकलं, आनंद शिंदेना अश्रू अनावर










