'आई-वडिलांचा डिवोर्स त्रासदायक', माजी मुख्यमंत्र्यांचा नातू पहिल्यांदाच बोलला
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Veer Pahariya on Parental Conflict : माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू वीर पहारिया याने 'स्काय फोर्स' सिनेमातून पदार्पण केलं आहे. आई-वडिलांच्या घटस्फोटामुळे लहानपणी त्याला कोणत्या गोष्टींचा सामना करावा लागला याबद्दल त्याने सांगितलं.
मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू मोठ्या पडद्यावर झळकतोय. वीर पहारिया याने स्काय फोर्स सिनेमातून पदार्पण केलं आहे. अक्षय कुमार, निमृत कौर, सारा अली खान आणि वीर पहाडिया यांचा स्कायफोर्स हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. सिनेमाला प्रेक्षकांची पसंती मिळत असताना दुसरीकडे वीर पाहारिया याचं वैयक्तिक आयुष्य देखील चर्चेत आलं आहे. वीरने त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे. आई-वडिलांच्या घटस्फोटाबद्दल वीरनं पहिल्यांदा सांगितलं. वीरने एका मुलाखतीत त्याच्या आई-वडिलांच्या घटस्फोटाबद्दल सांगितलं. आई वडिलांच्या घटस्फोटानंतर मला शाळेत जायला लाज वाटायची असं तो म्हणाला.
कोण आहेत वीर पहाडियाचे आई-वडील?
वीर राजकीय कुटुंबातील आहे. त्यांचे वडील संजय पहाडिया हे व्यापारी आहेत आणि आई स्मृती शिंदे या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या कन्या आहेत. आपल्या बालपणाबद्दल बोलताना वीर म्हणाला की, लहानपणी शाळेत जायला लाज वाटायची.
advertisement
'पालकांच्या डिवोर्सचा आमच्यावर परिणाम'
पिंकविलाच्या वृत्तानुसार, सिद्धार्थ काननसोबत झालेल्या संवादात वीर पहाडियाने सांगितले की, त्याच्या आई-वडिलांपासून वेगळे झाल्यानंतर त्याचे बालपण खूप कठीण गेले. लहानपणी आणि तेही पालकांमधील तुटलेले नाते कोणत्याही मुलाने पाहणे योग्य नाही. मी खूप लहान होतो आणि हे मित्रांसोबत कसे शेअर करावे हे माहित नव्हतं.
'मला अभिनयात दिलासा मिळाला'
advertisement
वीर पुढे म्हणाला की, "त्याच्या शाळेतील मुले त्याच्यावर हसायची आणि तो कोणाशीही शेअर करू शकत नव्हता. या प्रकरणाबाबतचे छोटे-छोटे तपशीलही मीडियात यायचे, जे वीरसाठी खूप त्रासदायक होते. तो म्हणाला की मला शाळेत जायला लाज वाटायची. माझे फारसे मित्र नव्हते आणि लोक माझ्यापासून दूर राहिले."
वीरने सांगितले की, "तो एक अत्यंत आत्मविश्वास नसलेला आणि चिंताग्रस्त मुलगा आहे आणि कोणत्याही मुलासोबत असे होऊ नये असे त्याला वाटत होते. लोकांनी एकमेकांशी बोलले पाहिजे जेणेकरुन अशा गोष्टींविरुद्ध मुलांना एकटं लढावं लागणार नाही. अभिनयाने मला थेरपीप्रमाणे संघर्ष करण्यास मदत केली. आजही माझा विवाह आणि प्रेमावर विश्वास आहे."
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 30, 2025 12:19 PM IST


