Tejaswini Lonari Engagement : अभिनेत्री तेजस्विनी लोणारी होणार शिवसेना नेत्याची सून, गुपचूप उरकला साखरपुडा
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Tejaswini Lonari Engagement : अभिनेत्री तेजस्विनी लोणारी शिवसेना नेत्याची सून होणार आहे. नुकताच तिचा साखरपुडा पार पडला. तिच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
बिग बॉस मराठी सीझन चार गाजवणारी प्रसिद्ध मराठी अभिनेत्री तेजस्विनी लोणारीनं हिनं चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे. तेजस्विनीनं गुपचूप साखरपुडा उरकला आहे. तेजस्विनी प्रसिद्ध शिवसेना नेत्याची सून होणार आहे. तेजस्विनीच्या साखरपुड्याचे फोटो आणि व्हिडीओ नुकतेच समोर आलेत. तेजस्विनीने दिलेल्या या आनंदाच्या बातमीने चाहते मात्र शॉक झालेत.
तेजस्विनी लोणारी हिनं मराठी बिग बॉसचा चौथा सीझन गाजवला होता. त्या सीझनमध्ये तिला हाताला झालेल्या दुखापतीमुळे नाईलाजास्तव एक्झिट घ्यावी लागली होती. त्यानंतर ती 'तुझेच मी गीत गात आहे' या स्टार प्रवाहच्या मालिकेत ती दिसली होती. अभिनेत्री प्रिया मराठेला तिने रिप्लेस केलं होतं. मालिकेतील खलनायिकेचं पात्र तिनं उत्तमरित्या साकारलं होतं.
advertisement
तेजस्विनी लोणारी लग्न कधी करणार याकडे सर्वांचं लक्ष होतं. अनेकदा तिला लग्नाविषयी प्रश्न देखील विचारण्यात येत होते मात्र तिनं कधीच तिच्या लग्नाविषयी भाष्य केलं नव्हतं. अखेर तिनं साखरपुडा करत आनंदाची बातमी चाहत्यांनी दिली.
तेजस्विनी लोणारी ही शिंदे गटाचे नेते सदा सरवणकर यांची सून होणार आहे. सदा सरवणकर यांचा मुलगा शिवसेना युवा नेते समाधान सरवणकर यांच्याशी तिचा साखरपुडा झाला. समाधान सरवणकर हे सुद्ध राजकारणात सक्रीय आहेत. तेजस्विनी लोणारी आणि समाधान सरवणकर यांनी नुकताच साखरपुडा केला आहे.
advertisement
advertisement
साखरपुड्यासाठी तेजस्विनीनं रेड कलरचा लेहेंगा वेअर केला होता. हातात हिरवा चुडा आणि तिच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. तेजस्विनी आणि समाधान सरवणकर यांची भेट कुठे झाली? दोघांचं लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे.
अभिनेत्री तेजस्विनी लोणारी ही अभिनयाव्यतिरिक्त अनेक क्षेत्रात सक्रीय आहे. ती प्रचंड अध्यात्मिक आहे. ती प्राण्यांसाठी NGO चालवते. 'छापा काटा', 'वॉन्टेंड बायको नंबर वन', 'गुलदस्ता', 'दोघांत तिसरा आता सगळं विसरा', 'कलावती' सारख्या अनेक सिनेमांत तिनं काम केलं आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 27, 2025 9:04 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Tejaswini Lonari Engagement : अभिनेत्री तेजस्विनी लोणारी होणार शिवसेना नेत्याची सून, गुपचूप उरकला साखरपुडा


