The Family Man 3 : श्रीकांत तिवारी इज ऑन द वे! 'द फॅमिली मॅन सीझन 3'च्या रिलीज डेटबाबत मोठी अपडेट

Last Updated:

The Family Man Season 3 : प्राइम व्हिडिओने द फॅमिली मॅन सीझन 3 च्या रिलीज डेटबाबत महत्त्वाची अपडेट दिली आहे. मनोज बाजपेयी आणि टीम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

News18
News18
प्राइम व्हिडिओवरील द फॅमिली मॅन या वेब सीरिजचा जबरदस्त चाहता वर्ग झाला आहे. मागील चार वर्षात या सीरिजचे दोन सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आले. त्यानंतर आता तिसरा सीझन देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीझनबाबत अनेकदा विचारणा झाली होती. चाहत्यांच्या विनंतीला मान देत अखेर निर्मात्यांकडून द फॅमिली मॅन सीझन तीनबद्दल महत्त्वाची अपडेट देण्यात आली आहे.
द फॅमिली मॅनच्या आधीच्या दोन सीझनमधून अभ्नेता राज-डीके, मनोज बाजपेयी, शारीब हाशमी आणि इतर कलाकारांनी प्रचंड लोकप्रियता मिळवली. सोशल मीडियावरही त्यांची क्रेझ दिसून येत आहे. या सगळ्या कलाकारांना पुन्हा एकदा ओटीटीवर पाहण्यासाठी चाहते सज्ज होते. अखेर चाहत्यांची ही मागणी पूर्ण होणार आहे.
advertisement
द फॅमिली मॅन ही एक जासूसी आणि ॲक्शनने भरलेली कथा आहे. यात मनोज बाजपेयी मुख्य भूमिकेत श्रीकांत तिवारी म्हणून दिसतात. त्यांच्या सोबत जयदीप अहलावत, निमरत कौर, शारिब हाशमी, प्रियामणी, अशलेषा ठाकूर, वेदांत सिन्हा, श्रेया धनवंतरी आणि गुल पनाग यांसारखे कलाकारही झळकणार आहेत.
"श्रीकांत तिवारी इज ऑन द वे! द फॅमिली मॅन प्राइमवर येत आहे. उद्या रिलीज डेट आऊट करू", असं म्हणत प्राइम व्हिडीओनं चाहत्यांना मोठी अपडेट दिली आहे. द फॅमिली मॅन 3 कधी रिलीज होणार याची अपडेट उद्याच मिळणार आहे.
advertisement
advertisement
या मालिकेची कथा राज, डीके आणि सुमन कुमार यांनी लिहिली आहे, संवाद सुमित अरोरा यांनी दिले आहेत, आणि दिग्दर्शन राज-डीके यांनी केले आहे. या सीझनमध्ये त्यांच्यासोबत सुमन कुमार आणि तुषार सेठही दिग्दर्शक म्हणून सहभागी झाले आहेत.
द फॅमिली मॅन सीझन 3 लवकरच फक्त प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे. ही मालिका भारतासह जगभरातील 240 पेक्षा अधिक देश आणि प्रदेशांमध्ये पाहता येणार आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
The Family Man 3 : श्रीकांत तिवारी इज ऑन द वे! 'द फॅमिली मॅन सीझन 3'च्या रिलीज डेटबाबत मोठी अपडेट
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement