Vaishnavi Hagawane: 'दाबले गेलेले प्रकरण...', वैष्णवी हगवणे प्रकरणावर मराठी दिग्दर्शकाचा संताप

Last Updated:

Vaishnavi Hagawane: पुण्यातील 23 वर्षांची वैष्णवी हगवणे हिने 16 मे रोजी आत्महत्या केल्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे.

 वैष्णवी हगवणे प्रकरणावर मराठी दिग्दर्शकाचा संताप
वैष्णवी हगवणे प्रकरणावर मराठी दिग्दर्शकाचा संताप
मुंबई : पुण्यातील 23 वर्षांची वैष्णवी हगवणे हिने 16 मे रोजी आत्महत्या केल्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. भुकूम येथील तिच्या सासरच्या घरी तिचा मृतदेह आढळला आणि सुरुवातीला आत्महत्या मानली गेलेली घटना आता एका अमानुष सत्याची ओरड बनली आहे.
पोस्टमार्टम अहवालानुसार वैष्णवीला मृत्यूपूर्वी जबरदस्त मारहाण करण्यात आली होती. तिच्या अंगावर पाइपने झालेल्या मारहाणीच्या खुणा स्पष्ट दिसून आल्या आहेत. पोलिस तपासात समोर आले आहे की, तिच्या सासरच्या लोकांनी तिच्याकडून माहेरून दोन कोटी रुपये आणण्याची मागणी केली होती. ही मागणी पूर्ण न केल्याने तिच्यावर सातत्याने मानसिक आणि शारीरिक छळ केला गेला.
advertisement
वैष्णवीचा पती शशांक हगवणे, सासरे राजेंद्र, सासू, दीर आणि नणंद यांना पोलिसांनी अटक केली आहे. सासरे आणि दीर हे एक आठवडा फरार होते. अखेर 23 मे रोजी पोलिसांनी त्यांना पकडले. त्यांना 28 मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
advertisement
वैष्णवी हगवणे प्रकरणामुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. अनेक लोक आपलं संताप सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त करत आहेत. अशातच आता दिग्दर्शक-निर्माते सचिन गोस्वामी यांनी हुंडाबळीवर एक पोस्ट शेअर केलीय.
सचिन गोस्वामी पोस्ट
"खेळ हुंड्याचा 'या नावाची प्रा.भगवान ठाकूर लिखित एकांकिका मी 1987 साली केली होती.त्या वेळी हुंडाबळी ची समस्या ज्वलंत वाटायची.आणि नाटक हे परिवर्तनाचे महत्वाचे साधन वाटायचे. 38 वर्षे झाली परिस्थिती आजही तशीच आहे, नाटक परिवर्तन घडवतं या भ्रमातून मी मात्र बाहेर आलोय समाजातील तळागाळातील,अशिक्षित घटकात ही कुरीती आहे असे वाटत असतानाच,उच्च वर्ग ,सुशिक्षित मंडळी ही या व्याधीने ग्रस्त आहे ,हे वास्तव बाहेर आलं. सरकार,कायदा,नैतिक जाणीव या सगळ्यांना मुठमाती देऊन घरातील सुनेचा जीव घेतला जातो.आणि एक सणसणीत बातमी ते दाबलेगेलेले प्रकरण होऊन हा विषय तेव्हड्यापुरता संपतो आणि आपण हतबल होऊन मूक पणे हे पाहत राहतो.. अत्यंत दुर्दैवी आणि क्लेशदायक आहे हे..'
advertisement
दरम्यान, वैष्णवीवर झालेल्या अत्याचार, हिंसाचाराच्या प्रकरमामुळे पुन्हा एकदा महिला सुरक्षितता आणि हुंडाबळीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
मराठी बातम्या/मनोरंजन/
Vaishnavi Hagawane: 'दाबले गेलेले प्रकरण...', वैष्णवी हगवणे प्रकरणावर मराठी दिग्दर्शकाचा संताप
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement