Chhaava Movie: रात्री 1 वाजता विक्की कौशलला भरली धडकी, 'छावा'चा 'तो' व्हिडीओ पाहण्याआधी देवासमोरच ठेवला मोबाईल

Last Updated:

Chhaava Movie Vicky Kaushal: विक्की कौशल, रश्मिका मंदाना आणि अक्षय खन्ना स्टारर 'छावा' सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या सिनेमाने रिलीज होताच रेकॉर्ड बनवला.

रात्री 1 वाजता विक्की कौशलला भरली धडकी
रात्री 1 वाजता विक्की कौशलला भरली धडकी
मुंबई : विक्की कौशल, रश्मिका मंदाना आणि अक्षय खन्ना स्टारर 'छावा' सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या सिनेमाने रिलीज होताच रेकॉर्ड बनवला. 2025 चा मोठा ओपनर ठरला. छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित हा सिनेमा सध्या चांगलाच चर्चेत असून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. थिएटर हाऊसफुल्ल असून शोसाठी लोक वेटिंगवर आहेत. 'छावा' रिलीज झाल्यापासून सिनेमाविषयी आणि सिनेमातील कलाकारांविषयी काही ना काही नवनवीन माहिती समोर येत आहे. अशातच आता विक्कीचा एक व्हिडिओ समोर आलाय ज्यामध्ये त्याने रात्री 1 वाजता धडकी भरल्याचं सांगितलं.
'छावा' सिनेमाचा ट्रेलर जेव्हा रिलीज झाला तेव्हा प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. मात्र हा ट्रेलर जेव्हा आला तेव्हा विक्कीला चांगलीच धडकी भरली होती. त्याला एवढी भीती वाटत होती की त्याने त्याचा मोबाईल देवासमोर मंदिरात ठेवला होता.
विक्की कौशलने मोबाईल मंदिरात का ठेवला?
विक्की कौशलने ABP न्यूजला दिलेल्या मुलाखतीमध्ये 'छावा'चा ट्रेलर रिलीज झाला तेव्हा त्याने कोणाला दाखवला आणि त्याची रिअॅक्शन काय होती? याविषयी खुलासा केला. विक्कीने सांगितलं, "जेव्हा ट्रेलर रिलीज झाला त्याच्या आदल्या रात्री 1 वाजताच्या दरम्यान ट्रेलर मला पाठवण्यात आला होता. मी एवढा घाबरलो होतो की, ट्रेलर कसा आहे, काय आहे? कारण एवढी मेहनत केली होती. पहिल्यांदा मी गेलो आणि मोबाईल देवासमोर मंदिरात ठेवला आणि मग मी प्ले केला. मी म्हणाले देवा सांभाळून घे..खूप मेहनत केलीय. मला काय माहिती नाही कसा आहे ट्रेलर प्लीज तेवढं बघून घ्या. मी संपूर्ण ट्रेलर मोबाईल मंदिरात ठेवूनच पाहिला."
advertisement
विक्की पुढे म्हणाला, "त्यानंतर मी ट्रेलर आईला दाखवला. तर ती पाहून रडली. मग मी पप्पा, कतरिना, सनीला दाखवला. त्यांनाही आवडला. आणि प्रेक्षकांनाही ट्रेलर आवडला आणि त्यांनीही खूप प्रेम दिलं."
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
Chhaava Movie: रात्री 1 वाजता विक्की कौशलला भरली धडकी, 'छावा'चा 'तो' व्हिडीओ पाहण्याआधी देवासमोरच ठेवला मोबाईल
Next Article
advertisement
Gold Price Prediction: सोन्याच्या बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ चीच पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवणारा अंदाज
सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण
  • सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण

  • सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण

  • सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण

View All
advertisement