ऐश्वर्याशी लग्न करण्याआधीच विवाहित होता अभिषेक? जान्हवी कपूरने दिली होता नस कापण्याची धमकी
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
जान्हवी कपूरने दावा केला होता की, अभिषेक बच्चनने २००६ मध्ये तिच्याशी गुपचूप लग्न केले होते.
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन सध्या त्यांच्या वैवाहिक आयुष्यातील अडचणींमुळे चर्चेत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून ऐश्वर्या आणि अभिषेक घटस्फोट घेणार असल्याच्या अफवांना उधाण आलं होतं. अनंत अंबानीच्या लग्नात वेगवेगळे दिसलेलं कुटुंब आराध्याच्या शाळेतील वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात एकत्र दिसलं. त्यानंतर त्यांच्या घटस्फोटांच्या अफवा थांबल्या आहेत. मात्र, ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नाबाबत एक अशी गोष्ट समोर आली आहे, ज्यामुळे चाहत्यांना पुन्हा एक धक्का बसला आहे.
अभिषेक आणि ऐश्वर्याने २००७ मध्ये लग्न केले. त्यावेळी जान्हवी कपूरने त्यांचे लग्न थांबवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. इतकंच नाही, तर तिने तिच्या मनगटाची नसही कापली होती. ही जान्हवी कपूर बॉलीवूड अभिनेत्री नाही, तर एक मॉडेल होती, जी दावा करत होती की अभिषेक बच्चनने तिच्याशी आधीच लग्न केले आहे.
advertisement
जान्हवी कपूर नावाच्या एका मॉडेलने दावा केला होता की, अभिषेक बच्चनने २००६ मध्ये तिच्याशी गुपचूप लग्न केले होते. जान्हवीने अभिषेकविरोधात एफआयआरही दाखल केला होता, पण तिच्याकडे लग्नाचा कोणताही पुरावा किंवा साक्षीदार नव्हता. त्यामुळे पोलिसांनीही अभिषेकवर कोणतीही कारवाई केली नाही.
जान्हवीने लग्न मोडण्याचा खूप प्रयत्न केला, पण तसे न झाल्याने तिने लग्नाच्या दिवशीच आपले मनगट कापले, त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करावे लागले. त्यावेळी जान्हवीने बराच गदारोळ केला होता, त्यामुळे ऐश्वर्या आणि अभिषेकला त्यांचा लग्नसोहळा थोडक्यात आटोपावा लागला होता.
advertisement
त्यांच्या लग्नाला फारसे लोकांना आमंत्रित करण्यात आले नव्हते आणि या जोडप्याने जवळचे मित्र आणि कुटुंबीयांमध्ये लग्न केले. याबाबत प्रश्न विचारला असता, अमिताभ बच्चन यांची आई तेजी बच्चन त्या वेळी आजारी असल्याने हे लग्न साधेपणाने पार पडले, असा खुलासा बच्चन कुटुंबाकडून करण्यात आला.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 11, 2025 7:35 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
ऐश्वर्याशी लग्न करण्याआधीच विवाहित होता अभिषेक? जान्हवी कपूरने दिली होता नस कापण्याची धमकी