Mulshi Pattern 2: आरारारा...खतरनाक! मुळशी पॅटर्न 2 कधी येणार? रिलीज बाबत मोठी घोषणा!

Last Updated:

Mulshi Pattern 2 : मुळशी पॅटर्नचा यशानंतर प्रेक्षक या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची आतुरतेनं वाट पाहत आहेत. पुन्हा एकदा आरारारा...खतरनाकचा दणका पहायला उत्सुक आहेत. अशातच आता मुळशी पॅटर्न 2 बाबत मोठी घोषणा समोर आलीय.

मुळशी पॅटर्न 2 कधी येणार?
मुळशी पॅटर्न 2 कधी येणार?
मुंबई : आरारारा...खतरनाक! हा मुळशी पॅटर्नमधील डॉयलॉग सगळ्याच मराठी रसिक प्रेक्षकांच्या तोंडात बसलाय. प्रविण तरडे यांनी दिग्दर्शित केलेला मुळजी पॅटर्न हा चित्रपट प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाल केली. या चित्रपटाने मराठी सिनेसृष्टीत चांगलीच खळबळ उडवली आणि प्रेक्षकांना थिएटरपर्यंत खेचून आणलं. मुळशी पॅटर्नचा यशानंतर प्रेक्षक या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची आतुरतेनं वाट पाहत आहेत. पुन्हा एकदा आरारारा...खतरनाकचा दणका पहायला उत्सुक आहेत. अशातच आता मुळशी पॅटर्न 2 बाबत मोठी घोषणा समोर आलीय.
मुळशी पॅटर्न चा पुढचा भाग म्हणजेच पार्ट 2 कधी येणार? याविषयी निर्माता पुनीत बालन आणि दिग्दर्शक प्रविण तरडे यांनी मोठी घोषणा केलीय. आज दहीहंडीच्या कार्यक्रमात त्यांनी ही आनंदाची बातमी शेअर केली. दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने मोस्ट अवेटेड मुळशी पॅटर्न 2 ची घोषणा करून टाकली.
advertisement
पुढच्या वर्षी बरोबर दहीहंडीच्या वेळी 'मुळशी पॅटर्न 2' रिलीज करू, अशी घोषणा सिने निर्माता पुनीत बालन यांनी न्यूज18 लोकमतशी बोलताना केली. बरोबर 7 वर्षांपूर्वी मुळशी पॅटर्न हा सिनेमा रिलीज झाला होता. याच सिनेमाच्या माध्यमातून प्रवीण तरडे घराघरात पोहोचले त्यानंतर बरोबर 7 वर्षांनी आज या दोघांनी मुळशी पॅटर्नचा पुढचा भाग म्हणजेच पार्ट 2 येणार असल्याची घोषणा करून टाकली. त्या दोघांशी न्यूज18 लोकमतने ही exclusive बातचीत केली.
advertisement
दरम्यान, 2018 साली आलेल्या मुळशी पॅटर्न प्रेक्षकांमध्ये खूप चालला. या चित्रपटाच्या यशानंतर या चित्रपटाच्या दुसऱ्या भाषांमध्ये रिमेकदेखील बनवण्यात आला. त्यामुळे आता मुळशी पॅटर्नच्या येत्या भागात काय खास असेल? हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
मराठी बातम्या/मनोरंजन/
Mulshi Pattern 2: आरारारा...खतरनाक! मुळशी पॅटर्न 2 कधी येणार? रिलीज बाबत मोठी घोषणा!
Next Article
advertisement
Superstar Fathers Flop Sons: सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
    View All
    advertisement