बिर्याणी नाही ‘हा’ आहे भारतातला सर्वांत लोकप्रिय पदार्थ, महाराष्ट्रीयन फूड कितव्या क्रमांकावर?

Last Updated:

टेस्ट अ‍ॅटलासनं भारतातल्या अशा 100 लोकप्रिय पदार्थांची क्रमवारी जाहीर केली. त्यातल्या सर्वांत लोकप्रिय 10 पदार्थांमध्ये बिर्याणीचा समावेश नसून वेगळ्याच पदार्थाला पहिलं स्थान मिळालं आहे.

(भारतातील टॉप 10 फूड)
(भारतातील टॉप 10 फूड)
मुंबई, 18 ऑगस्ट : भारतात अनेक संस्कृतींचा सुंदर मिलाफ झाला आहे. त्याचप्रमाणे इथल्या खाद्यसंस्कृतीतही विविधता आढळते. भौगोलिक प्रदेश, संस्कृती यानुसार खाद्यपदार्थांमध्ये नावीन्य दिसतं. चटणी, नान, पारंपरिक पक्वान्न, भाताचे प्रकार, पाणी-पुरी, वडापाव सारखे चटपटीत पदार्थ ही भारताची ओळख आहेत. टेस्ट अ‍ॅटलासनं भारतातल्या अशा 100 लोकप्रिय पदार्थांची क्रमवारी जाहीर केली. त्यातल्या सर्वांत लोकप्रिय 10 पदार्थांमध्ये बिर्याणीचा समावेश नसून वेगळ्याच पदार्थाला पहिलं स्थान मिळालं आहे.
भारतातल्या रेस्टॉरंट्समध्ये नाश्ता, दुपारचं जेवण किंवा रात्रीचं जेवण यासाठी हमखास मेनूमध्ये जे पदार्थ दिसतात, तेच भारतातले लोकप्रिय पदार्थ आहेत. भारतीयांना चटपटीत, मसालेदार आणि स्वादिष्ट पदार्थ आवडतात. यात सामोसे, बटर चिकन, कुर्मा, टिक्का यांच्याबरोबरच भारतीय थाळीलाही स्थान मिळालं आहे. दक्षिणेकडील पदार्थांपैकी डोसा या पदार्थाला संपूर्ण भारतभर पसंती मिळालेली आहे. नाश्त्यासाठीचा हा खूप लोकप्रिय पदार्थ आहे. तांदूळ आणि उडीद डाळीच्या मिश्रणापासून तयार केलेला हा पातळ डोसा हा पारंपरिक दाक्षिणात्य पदार्थ आहे. बटाट्याची भाजी, सांबार आणि चटणी यांच्यासोबत हा डोसा सर्व्ह केला जातो. नवव्या स्थानावर विंदालू या आणखी एका लोकप्रिय पदार्थाचा क्रमांक लागतो. मटण, चिकन, बीफ, पोर्क किंवा प्रॉन यांची करी म्हणजे विंदालू. गोवा, कोकण या समुद्राकडच्या भागांमध्ये हा प्रामुख्यानं केला जातो. ब्रिटनमध्येही तो प्रसिद्ध आहे. पंधराव्या शतकात पोर्तुगीजांसोबत तो गोव्यात आला. यात वाईन, व्हिनेगर आणि लसणाच्या मॅरिनेशनमध्ये मटण कालवलं जातं. भारतीय मसाल्यांमुळे त्याची लज्जत आणखी वाढली आहे.
advertisement
संपूर्ण भारतभर मिळणारा आणि प्रसिद्ध असणारा सामोसा हा आठव्या क्रमांकाचा लोकप्रिय पदार्थ आहे. मध्य आशियामध्ये याचा उगम आढळतो. व्यापारी मार्गाद्वारे याचा भारतात शिरकाव झाला. आंबट-गोड चटण्यांसोबत सामोसा सर्व्ह केला जातो.  कुर्मा ही डिश अकबराच्या शाही मुदपाकखान्यात तयार केली जायची. ही सातव्या क्रमांकाची लोकप्रिय डिश आहे. क्रिमी टेक्श्चर असलेली केशर, दही, मसाले, मटण यांचा वापर करून तयार केलेल्या या पदार्थाचा स्वाद माईल्ड पण शाही स्वरूपाचा असतो. पर्शियन आणि भारतीय खाद्यसंस्कृतीचा यात मिलाफ दिसतो.
advertisement
अनेक पदार्थांनी भरलेल्या अस्सल भारतीय थाळीचा क्रमांक सहावा लागतो. भात, पोळी, भाज्या, कोशिंबीर, वड्या, चटण्या, पापड, गोड पदार्थ अशा सर्व चवींची मिळून तयार झालेली ही थाळी भारतीयांना खूप पसंत आहे.
मटण, चिकन किंवा पनीर टिक्का हाही खूप आवडीचा खाद्यप्रकार आहे. याचा पाचवा क्रमांक लागतो. दही व इतर मसाल्यांच्या मिश्रणात मॅरिनेट करून टिक्का तयार केला जातो. शक्यतो चुलीवर भाजून टिक्का तयार होतो. याचसारखा आणखी एक स्वादिष्ट पदार्थ म्हणजे तंदुरी. कोळशावर हे भाजले जातात. त्यामुळे त्याला एक खास वेगळी चव येते. मध्य-पूर्वेकडच्या ब्रेड भाजण्याच्या पद्धतीप्रमाणे हे भाजले जातात.
advertisement
तिसऱ्या क्रमांकावर बटर चिकन तर दुसऱ्या क्रमांकावर नान यांना स्थान मिळालेलं आहे. दिल्लीच्या मोती महल रेस्टॉरंटमध्ये 1950 मध्ये पहिल्यांदा हा पदार्थ मिळू लागला. यालाच मुर्ग मखनी असंही म्हणतात. बटर, टोमॅटोपासून तयार केलेल्या मॅरिनेशनमुळे याला एक अनोखी चव येते. हा पदार्थ अपघातानं तयार झाला, मात्र आता आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रिय झाला आहे. नान या पोळीसारख्या मैद्याच्या जाड पदार्थाचा शोध भारतातच लागला. अमीर खुस्रो या कवीच्या कागदपत्रांमध्ये याचा उल्लेख आढळून आला.
advertisement
मैदा, यीस्ट, दूध, साखर, मीठ आणि अंडी यांचा वापर करून नान तयार होतो. बटर गार्लिक नान या स्वादिष्ट पदार्थाला पहिला क्रमांक मिळाला आहे. लसूण आणि बटरची चव या नानला वैशिष्ट्यपूर्ण बनवते. कोणत्याही भाजीसोबत, करीसोबत किंवा स्टार्टर म्हणूनही तो खाल्ला जातो. शाकाहारी आणि मांसाहारी अशा दोन्ही पद्धतीचे पदार्थ भारतात लोकप्रिय आहेत. बिर्याणीपेक्षाही इतर अनेक पदार्थांना लोकांची पसंती जास्त दिसून येते.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
बिर्याणी नाही ‘हा’ आहे भारतातला सर्वांत लोकप्रिय पदार्थ, महाराष्ट्रीयन फूड कितव्या क्रमांकावर?
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement