Snoring : रात्री झोपेत घोरण्याची सवय आहे का ? हे उपाय नक्की करा...घोरण्याचं प्रमाण होईल कमी
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
गाढ झोपेत गेल्यावर काही जण घोरायला लागतात. अशा स्थितीत जवळ झोपलेल्या व्यक्तीला काळजी वाटू लागते. घोरण्याची सवय कमी करण्यासाठी काही टिप्स उपयोगी ठरतील.
मुंबई: अनेकांना घोरण्याची सवय असते. घोरण्याचा तुमच्या झोपेवर आणि आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. हा त्रास कमी करण्यासाठी तुम्ही काही सोप्या टिप्स फॉलो करू शकता.
अनेकांना रात्री घोरण्याची सवय असते, गाढ झोपेत गेल्यावर काही जण घोरायला लागतात. अशा स्थितीत जवळ झोपलेल्या व्यक्तीला काळजी वाटू लागते. घोरण्याची सवय कमी करण्यासाठी काही टिप्स उपयोगी ठरतील.
- झोपण्याची पद्बत बदला -
advertisement
पाठीऐवजी पोटावर झोपल्यानं तुम्हाला श्वास घेणं सोपं होईल. तुम्ही झोपताना जिथे डोकं ठेवता, त्या उशीवर आणखी एखादी चादर किंवा उशी ठेवा. थोडक्यात तो भाग थोडा उंच करा. किंवा तुमच्या पलंगाचे हेडरेस्ट थोडं उंच ठेवून तुमची झोपेची स्थिती सुधारू शकता.
advertisement
- जीवनशैलीत बदल करा -
नियमित व्यायाम आणि वजन कमी केल्यानं तुमची श्वास घेण्याची क्षमता सुधारते. धूम्रपान आणि अल्कोहोलचं सेवन बंद केल्यानं तुमचं आरोग्य सुधारतं, ज्यामुळे घोरण्याची समस्या कमी होईल. तसंच, झोपण्यापूर्वी जड अन्न खाऊ नका आणि पुरेशी झोप घ्या, यामुळेही घोरण्याचं प्रमाण कमी होण्यास मदत होते.
advertisement
याशिवाय तुम्ही या उपायांचा अवलंब करू शकता-
झोपण्यापूर्वी कोमट पाण्यानं आंघोळ करा.
झोपण्यापूर्वी कॉफी आणि चहा पिऊ नका.
झोपण्याची खोली बंद ठेऊ नका. खोलीच्या खिडक्या उघड्या ठेवा.
या झाल्या घरगुती टिप्स पण तुमची घोरण्याची समस्या गंभीर असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणं योग्य ठरेल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 25, 2024 3:46 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Snoring : रात्री झोपेत घोरण्याची सवय आहे का ? हे उपाय नक्की करा...घोरण्याचं प्रमाण होईल कमी