Harmful Energy Drinks: ‘या’ देशाने घातली एनर्जी डिंक्सवर बंदी; लहान मुलांवर होतात विपरीत परिणाम

Last Updated:

Effects of Energy Drinks: एनर्जी ड्रिंक्समुळे होणारे दुष्परिमाण ओळखून कंबोडिया देशाने शाळांमध्ये एनर्जी ड्रिंक्सवर बंदी घातली आहे. एनर्जी ड्रिंक्समुळे तरुणांमध्ये मधुमेहाचं प्रमाण वाढल्याचं दिसून आलं होतं. इतकंच नाही तर कंबोडियन सरकार शाळांमध्ये प्रार्थनेच्या वेळी मुलांना एनर्जी ड्रिंक्सच्या दुष्परिणामांबद्दल माहिती देणार आहे.

प्रतिकात्मक फोटो : ‘या’ देशांत लहान मुलांसाठी एनर्जी ड्रिंक्सवर बंदी
प्रतिकात्मक फोटो : ‘या’ देशांत लहान मुलांसाठी एनर्जी ड्रिंक्सवर बंदी
मुंबई : सध्या एनर्जी ड्रिंक्सचं फॅड आलंय. अनेक जण कारण नसताना एनर्जी ड्रिंक्स पिताना दिसतात. मोठ्याचं अनुकरण लहान मुलं करतात. ते फॅशन म्हणून एनर्जी ड्रिंक्स पितात. मात्र एनर्जी ड्रिंक्समुळे होणारे दुष्परिमाण ओळखून कंबोडिया देशाने शाळांमध्ये एनर्जी ड्रिंक्सवर बंदी घातली आहे. एनर्जी ड्रिंक्समुळे तरुणांमध्ये मधुमेहाचं प्रामण वाढत असल्याचं दिसून आलं होतं. त्यामुळे कंबोडिया सरकारने शाळांमध्ये आणि शाळेच्या आसपासच्या परिसरात एनर्जी ड्रिंक्स पिण्यावर आणि विक्रीवर संपूर्ण बंदी घातलीये. इतकंच नाही तर शाळांमध्ये प्रार्थनेच्या वेळी मुलांना एनर्जी ड्रिंक्सच्या दुष्परिणामांबद्दल माहिती दिली जाणार आहे.
Harmful Energy Drinks ‘या’ देशाने घातली एनर्जी डिंक्सवर बंदी; लहान मुलांवर होतात विपरीत परिणाम
नोएडातल्या डायट मंत्रा क्लिनिकच्या संस्थापिका आणि वरिष्ठ आहारतज्ज्ञ कामिनी सिन्हा यांनी सुद्धा एनर्जी ड्रिंक्स शरीरासाठी अपायकारक असल्याचं सांगितलं. त्यांच्या मते  बहुतांश एनर्जी ड्रिंक्समध्ये साखर आणि कॅफीनचं प्रमाण सर्वाधिक असते. याशिवाय त्यात अनेक उत्तेजकं असतात. एनर्जी ड्रिंक्स जास्त दिवस टिकावेत म्हणून त्यात अनेक प्रक्रिया केलेले रासायनिक घटक असतात जे शरीरासाठी धोक्याचे असतात. एनर्जी ड्रिंक्स प्यायल्यानंतर शरीराला त्वरित ऊर्जा मिळते, परंतु या एनर्जी ड्रिंक्समुळे शरीरातल्या साखरेची पातळी वाढते. जे धोकादायक आहे. वाढलेली सारखेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी अधिक प्रमाणात इन्सुलिन सोडले जाते. यामुळे इन्सुलिन निर्माण करण्याच्या क्षमतेवर ताण येऊन मधुमेह, हृदयरोग आणि स्ट्रोक यासारख्या आजारांचा सामना करावा लागू शकतो. एनर्जी ड्रिंक्स मुलांसाठी अधिक हानिकारक आहेत, कारण त्यांना हे पचवणं कठीण जाऊ शकतं. याशिवाय कॅफेनचा मुलांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकते.
advertisement
आरोग्यतज्ञांच्या मते, एनर्जी ड्रिंक्सच्या अतिवापरामुळे अनेक आरोग्यविषयक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. अतिरिक्त साखर पोटात गेल्याने वजन वाढू शकतं. गॅसेस आणि पचनाच्या समस्या निर्माण होऊ शकतात. एनर्जी ड्रिंक्सच्या नियमित सेवनाने केल्याने शरीराच्या नैसर्गिक ऊर्जेच्या पातळीवर परिणाम होतो, ज्यामुळे थकवा आणि मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो. एनर्जी ड्रिंक्सचं अतिसेवन आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. एनर्जी ड्रिंक्समध्ये आढळणारे टॉरीन आणि ग्वाराना यासारखे घटक मानसिक समस्या, चिंता आणि हृदयाची धडधड वाढवू शकतात. त्यामुळे लहान मुलं आणि कॉलेजला जाणाऱ्या युवकांसाठी एनर्जी ड्रिंक्स धोकादायक आहेत.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Harmful Energy Drinks: ‘या’ देशाने घातली एनर्जी डिंक्सवर बंदी; लहान मुलांवर होतात विपरीत परिणाम
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement