अति तिथे माती! दिवसभरात खाऊ नये जास्त अंडी, मग नेमकी खावी तरी किती? डॉक्टर सांगतात...

Last Updated:

काहीजण आवडीनं अंडी खातात, तर काहीजण प्रोटिन मिळवण्यासाठी अंडी खातात, परंतु दिवसभरात नेमकी किती अंडी खावी हे तुम्हाला माहितीये का?

News18
News18
नवी दिल्ली : उन्हाळा असो किंवा हिवाळा असो अनेक घरांमध्ये बाराही महिने अंडी शिजवली जातात. काहीजण आवडीनं अंडी खातात, तर काहीजण प्रोटिन मिळवण्यासाठी अंडी खातात, परंतु दिवसभरात नेमकी किती अंडी खावी हे तुम्हाला माहितीये का? याबाबत स्वत: डॉक्टरांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.
सिनियर डायटिशियन डॉक्टर रश्मी श्रीवास्तव यांनी सांगितलं की, दिवसभरात 1 किंवा 2 अंडी खाण्याचा समावेश संतुलित आहारात होतो. अंड्यांमधून शरीराला भरपूर प्रमाणात प्रोटिन मिळतं. त्यामुळे वजन कमी करणं आणि वाढवणं दोन्हीसाठी अंडी खाणं फायदेशीर ठरतं. तसंच अंड्यांमुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्तीही वाढू शकते. परंतु अंड्यांचा फायदा तेव्हाच मिळतो, जेव्हा ती प्रमाणात खाल्ली जातात.
advertisement
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, जर आपण प्रोटिन मिळवण्यासाठी अंड्यांचं सेवन करत असाल तर त्याआधी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा. कारण कोणी दिवसभरात किती अंडी खावी हे ज्याच्या त्याच्या उंची आणि वजनावर अवलंबून असतं. उदाहरणार्थ, जर आपलं वजन 60 किलो असेल तर आपण दिवसभरात 1 किंवा 2 अंडी खाऊ शकता. सामान्यत: शरीराला जास्त अंड्यांची आवश्यकता नसते. कारण अतिप्रमाणात अंडी खाल्ल्यास अन्नपचनात अडथळे येऊ शकतात. शिवाय अंडी गरम असल्यामुळे त्रास होऊ शकतो.
advertisement
डॉ. रश्मी सांगतात की, 2 अंड्यांमधून जवळपास 13 ग्रॅम प्रोटिन मिळतं. सामान्यत: नियमितपणे शरीरासाठी एवढं प्रोटिन पुरेसं असतं. काहीजण एकत्र अनेक अंडी खातात. परंतु असं करण्यापेक्षा प्रोटिनसह कार्बोहायड्रेटही घ्यावं. म्हणजेच 1 अंड सकाळी खावं, 1 अंड संध्याकाळी खावं आणि त्यासोबत ज्यांमधून कार्बोहायड्रेट्स मिळतील असे पदार्थ खावे, जसं की, धान्य, फळं, दूग्धजन्य पदार्थ, इत्यादी.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
अति तिथे माती! दिवसभरात खाऊ नये जास्त अंडी, मग नेमकी खावी तरी किती? डॉक्टर सांगतात...
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement