advertisement

Sabudana : साबुदाणा भिजत घालायला विसरलात; कच्च्या साबुदाण्यापासून अशी बनवा खिचडी आणि वडा

Last Updated:

Mahashivratri Fasting Sabudana Khichdi Without Soaking : साबुदाणा न भिजवताही खिचडी आणि वडे बनवता येतात. महाशिवरात्रीच्या उपवासानिमित्त ही रेसिपी नक्की ट्राय करून पाहा.

News18
News18
महाशिवरात्री म्हणजे कित्येकांचा उपवास आणि उपवास म्हणजे साबुदाणा आलाच. साबुदाण्याची खिचडी, साबुदाणा वडे, साबुदाणा खीर, साबुदाणा थालीपीठ.... पण यासाठी साबुदाणा भिजत घालावा लागतो. पण तुम्ही साबुदाणा भिजतच घालायला विसरलात. आता काय करायचं? तर नो टेन्शन. न भिजवताही साबुदाणा खिचडी, वडे बनवता येऊ शकता.
साबुदाणा न भिजवता त्यापासून खिचडी आणि वडे बनवता येतात हे वाचूनच तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल. पण असे कितीतरी व्हिडीओ सोशल मीडियावर उपलब्ध आहेत आणि त्यापैकीच रेसिपी व्हिडीओ आम्ही तुमच्यासाठी आणला आहे. आता साबुदाणा न भिजवता त्याच्यापासून हे पदार्थ कसे बनवायचे पाहुयात.
साबुदाणा खिचडी
तुम्ही दोन पद्धतीने बनवू शकता. एक म्हणजे साबुदाणा एका चाळणीत धुवून घ्या. चाळणीतच तो पसरवून घ्या. एका गॅसवर पातेलं ठेवून त्यात पाणी ठेवून उकळी येऊ द्या. आता या पातेल्यावर साबुदाणा असलेली चाळण ठेवा त्यावर झाकण ठेवा. काही मिनिटांनी तुम्ही उघडून पाहाल तर साबुदाणा भिजल्यासारखा तयार झालेला दिसेल. तो धुवून तुम्ही त्यापासून जशी एरवी खिचडी बनवता तशीच बनवून घ्या.
advertisement
साबुदाणा वडा
साबुदाणा मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्या. नंतर त्यात मिरची आणि आलं हवं असेल तर घालून पुन्हा थोडं फिरवून घ्या. आता यात कच्चा बटाटा किसून, जिरं आणि मीठ घालून मिक्स करून 10 मिनिटं मुरण्यासाठी ठेवा. बटाट्याला पाणी सुटतं. त्यामुळे गरज असेल तर अगदी थोडंसं पाणी घाला.
advertisement
गॅसवर पॅन किंवा कढईत तेल गरम करून घ्या. त्यात साबुदाण्याचं मिश्रण भजीसारखं सोडा किंवा वड्यांचा आकार देऊन खरपूस होईपर्यंत तळून घ्या.
आता तुम्ही न भिजवता कच्च्या साबुदाण्यापासून साबुदाणा खिचडी आणि साबुदाणा वडे ट्राय करून पाहा आणि कसे झाले आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
Sabudana : साबुदाणा भिजत घालायला विसरलात; कच्च्या साबुदाण्यापासून अशी बनवा खिचडी आणि वडा
Next Article
advertisement
मुंबई-नाशिक मार्गावर 131 KMचा नवा रेल्वे ट्रॅक; कनेक्टिव्हिटी वाढणार, प्रवास सुपरफास्ट; मोदी सरकारचा मेगा प्लान
मुंबई-नाशिक मार्गावर नवा रेल्वे ट्रॅक; कनेक्टिव्हिटी वाढणार, प्रवास सुपरफास्ट
  • महाराष्ट्रासाठी मोदी सरकारची मोठी भेट

  • प्रवासाचा वेग वाढणार आणि खर्च कमी होणार

  • थेट ज्योतिर्लिंगापर्यंत कनेक्टिव्हिटी वाढणार

View All
advertisement