कोनासोबत दाबेली खाल्लीय का? गुजरात स्टाईल स्पेशल डिश मिळतेय कुठं?

Last Updated:

मुंबईच्या खाऊ गल्लीत देश विदेशातील फेमस डिश मिळतात. कोन दाबेली खवय्यांचा आवडता पदार्थ आहे.

+
कोनासोबत

कोनासोबत दाबेली खाल्लीय का? पाहा गुजरात स्टाईल स्पेशल डिश मिळतेय कुठं?

मुंबई, 12 ऑक्टोबर: प्रत्येक भागाची एक वेगळी खाद्य संस्कृती असते. मुंबई म्हटलं की वडापाव, पाणीपुरी हे पदार्थ आपल्याला आठवतात. पण यासोबतच जगभरातील फेमस डिश या ठिकाणी चाखायला मिळतात. अगदी वडापाव प्रमाणेच सर्वांना आवडणारा पदार्थ म्हणजे दाबेली होय. आजपर्यंत आपण दाबेली पाव, बटर दाबेली, चीज दाबेली खाल्ली असेल. पण मुंबईतील घाटकोपरच्या खाऊ गल्लीत चक्क कोनासोबत दाबेली मिळतेय. आता ही कोन दाबेली अनेकांना भुरळ घालत असून खवय्ये गर्दी करत आहेत.
घाटकोपरची खाऊ गल्ली
घाटकोपर मधील खाऊ गल्ली मुंबईकर खवय्यांचं अत्यंत आवडीचं ठिकाण आहे. खाऊ गल्लीत अनेक प्रकारचे स्ट्रीट फूड आयटम्स आपल्याला मिळतात. येथील दिलखुश दाबेली स्टॉल खवय्यांना आकर्षित करतोय. कारण या ठिकाणी दाबेली ही आईस्क्रीमप्रमाणे कोनमध्ये सर्व्ह केली जाते. 40 रुपयांत मिळणारी ही कोन दाबेली खाण्यासाठी खवय्ये याठिकाणी आवर्जून येतात. या स्टॉलचे मालक ब्रिजेश गुप्ता गेल्या 25 वर्षांपासून या ठिकाणी दाबेली विकत आहेत.
advertisement
गुजरातमध्ये पाहिली होती कोन दाबेली
ब्रिजेश गुप्ता यांनी कोन दाबेली हा प्रकार गुजरातमध्ये बघितला होता. आपणही काहीतरी युनिक करायला हवं या अनुषंगाने त्यांनी त्यांच्या स्टॉलवर देखील कोन दाबेली विकण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे कोन दाबेलीसाठी लागणारा कोन हे ब्रिजेश गुप्ता स्वतः घरी तयार करतात. मैद्यापासून तयार केलेला हा कोन चवीला कुरकुरीत पण दाबेलीमुळे आणखीनच चविष्ट लागतो. हा कोन आकाराने अगदी आईस्क्रीम कोन प्रमाणेच असतो. त्या कोनमध्ये भरपूर दाबेली घालून त्यावर शेव घातली जाते.
advertisement
दरम्यान, ही युनिक डिश कोन दाबेली खाण्यासाठी अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व वयोगटातील खवय्ये या ठिकाणी गर्दी करतात, अशी माहिती ब्रिजेश गुप्ता यांनी दिली आहे.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
कोनासोबत दाबेली खाल्लीय का? गुजरात स्टाईल स्पेशल डिश मिळतेय कुठं?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement