'ही' हिरवीगार भाजी हार्टसाठी रामबाण! जास्त खाल्ली तर होतो किडनी स्टोन

Last Updated:

या भाजीत आयर्न, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन ई, पोटॅशियम, मॅग्नेशियम, प्रोटीन मोठ्या प्रमाणात असतात. म्हणूनच तिला सूपर फूड म्हटलं जातं.

आठवड्यातून 2 ते 3 वेळाच ही भाजी खावी.
आठवड्यातून 2 ते 3 वेळाच ही भाजी खावी.
सिमरनजीत सिंह, प्रतिनिधी
शाहजहापूर : पालेभाज्या म्हटलं की, अनेकजण नाक-तोंड मुरडतात. पण हिरव्यागार टवटवीत दिसणाऱ्या या भाज्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त असतात. त्यांमध्ये असे पौष्टिक गुणधर्म असतात ज्यांमुळे शरीरही छान टवटवीत राहतं. पालक भाजी तर व्हिटॅमिन्ससह विविध पोषक तत्त्वांनी परिपूर्ण असते.
या भाजीत भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात. त्यामुळे आहारात पालकचा समावेश असेल तर शरीर निरोगी राहतं. आपण पालकची भाजी बनवून खाऊ शकता किंवा पालकचा रसही पिऊ शकता. डोळ्यांच्या तीक्ष्ण दृष्टीसाठी ही भाजी फायदेशीर असते.
advertisement
कृषी विज्ञान केंद्र, नियामतपूरमधील शास्त्रज्ज्ञ डॉक्टर विद्या गुप्ता सांगतात की, पालक भाजीत आयर्न, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन ई, पोटॅशियम, मॅग्नेशियम, प्रोटीन मोठ्या प्रमाणात असतात. म्हणूनच तिला सूपर फूड म्हटलं जातं. पालकमधील व्हिटॅमिन ए डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतं. तर, यातील अँटीऑक्सिडंट गुणधर्मांमुळे शरिराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. तसंच यात असलेल्या नायट्रेट तत्त्वामुळे हार्ट अटॅकचा धोका कमी होतो.
advertisement
आहारात पालक भाजीचा समावेश असेल तर कर्करोग आणि हृदयरोगासह डायबिटीज, स्थूलपणा हळूहळू दूर होतो. शिवाय ही भाजी शरिरातली रक्ताची कमतरता भरून काढते. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, एका व्यक्तीने एका वेळी 100 ग्रॅम पालक भाजी खावी. शिवाय आठवड्यातून 2 ते 3 वेळाच या भाजीचा आहारात समावेश असायला हवा. कारण जास्त प्रमाणात पालक खाल्ल्यास किडनी स्टोन म्हणजेच मूतखडा होऊ शकतो.
advertisement
लक्षात घ्या, पालक भाजी कितीही गुणकारी असली तरी काही लोकांनी चुकूनही ती खाऊ नये. जसं की, हृदयरोगाचा सामना करणाऱ्या आणि रक्तासंबंधित औषधं घेणाऱ्या व्यक्तींनी ही भाजी खाऊ नये, असं डॉक्टर सांगतात.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.)
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला करा फॉलो…या लिंकवर क्लिक करा
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
'ही' हिरवीगार भाजी हार्टसाठी रामबाण! जास्त खाल्ली तर होतो किडनी स्टोन
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement