'ती' चिमूटभर खाल्ल्यास वर्षभर राहाल सुदृढ; अतिवापर झाल्यास होईल मूळव्याध, जरा जपून!

Last Updated:

आपल्याला जेवणात हा पदार्थ घालायला आवडत नसेल, तर आपण जसा आल्याचा चहा बनवतो, तसा या पदार्थाचा चहा बनवून पिऊ शकता. हा चहासुद्धा आवडत नसेल तर...

यात अँटीबॅक्टेरियल आणि अँटीइंफ्लेमेटरी गुणधर्म असतात.
यात अँटीबॅक्टेरियल आणि अँटीइंफ्लेमेटरी गुणधर्म असतात.
शिखा श्रेया, प्रतिनिधी
रांची : जेवणात दाताखाली काळीमिरी आली की, जीभ चुरचुरू लागते पण हीच तिखट काळीमिरी जेवणाची चव वाढवते. शिवाय आपल्या आरोग्यासाठीसुद्धा ती अत्यंत फायदेशीर असते. त्यामुळे आहारतज्ज्ञ दररोज अन्नपदार्थांमध्ये काळीमिरीचा वापर करण्याचा सल्ला देतात. जर योग्य प्रमाणात तिचा वापर केला, तर साथीच्या आजारांपासून शरिराचं रक्षण होतं.
झारखंडची राजधानी असलेल्या रांचीमधील आयुर्वेदिक डॉक्टर वी के पांडे सांगतात की, काळीमिरीत थीयामिन, पिरोडॉक्सन, रायबोफ्लॅक्सिन, फोलिक ऍसिड, व्हिटॅमिन सी आणि कॅल्शियमसह अनेक पोषक तत्त्व असतात. शिवाय यात व्हिटॅमिन केसुद्धा मोठ्या प्रमाणात असतं. ज्यामुळे ती दिसायला जरी बारीक दिसत असली, चवीला तिखट असली तरी आरोग्यासाठी रामबाण असते.
advertisement
सर्दी, तापावर मिळतो आराम!
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, रोजच्या जेवणात काळीमिरीचा वापर असेल, तर वर्षभर कोणत्याही ऋतूमध्ये सर्दी, तापासारखे साथीचे आजार जडण्याची भीती कमी असते. शिवाय जरी आपल्याला साथीचे आजार जडलेच, तर त्यावर लवकर आराम मिळतो. काळीमिरीत अँटीबॅक्टेरियल आणि अँटीइंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. ज्यामुळे सर्दीतून होणाऱ्या इन्फेक्शनपासून आपलं रक्षण होतं.
advertisement
आपल्याला जेवणात काळीमिरी घालायला आवडत नसेल, तर आपण जसा आल्याचा चहा बनवतो, तसा काळीमिरीचा चहा बनवून पिऊ शकता. हा चहासुद्धा आवडत नसेल, तर दररोज सकाळी उपाशीपोटी गरम पाण्यात चिमूटभर काळीमिरी पावडर आणि थोडंसं तूप घालून प्यावं. त्यामुळे सर्दी, खोकल्यावर आराम मिळतो. अगदी 24 तासांत हा परिणाम जाणवेल.
advertisement
अतिवापर धोक्याचा!
डॉक्टर सांगतात की, कोणताही पदार्थ प्रमाणात खाणं योग्य असतं. त्याचा अतिवापर नुकसानदायी ठरू शकतो. काळीमिरीचा वापर तर चिमूटभरच करावा. त्याहून अधिक काळीमिरी पोटात गेल्यास मूळव्याध म्हणजेच Piles होऊ शकतो, पोटात, छातीत जळजळ होऊ शकते. परिणामी, सारखं उकडल्याने जीव घाबराघुबरा होऊ शकतो.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.)
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला करा फॉलो…या लिंकवर क्लिक करा
advertisement
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
'ती' चिमूटभर खाल्ल्यास वर्षभर राहाल सुदृढ; अतिवापर झाल्यास होईल मूळव्याध, जरा जपून!
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement