दोन भावांची ठाण्यात हिट जोडी, विकतायत 40 हुन अधिक प्रकारचे मोमोज, खवय्यांची गर्दी

Last Updated:

इथे तुम्हाला खूप चविष्ट मोमोज खायला मिळतील. मोमो जोजो या दुकानात तुम्हाला 40 हुन अधिक प्रकारचे मोमोज खायला मिळतील.

+
News18

News18

साक्षी पाटील, प्रतिनिधी
ठाणे : मोमोज ही सध्या सगळ्यांच्या आवडीची गोष्ट आहे. ठाण्यात सध्या दोन मराठी भावांची जोडी चांगलीच गाजत आहे. त्यांनी मिळून स्वतःचे मोमोजचे दुकान ठाण्यातील वर्तक नगरच्या खाऊ गल्लीत सुरू केले आहे. इथे तुम्हाला खूप चविष्ट मोमोज खायला मिळतील. मोमो जोजो या दुकानात तुम्हाला 40 हुन अधिक प्रकारचे मोमोज खायला मिळतील.
advertisement
चिराग पाटील आणि भाविक पाटील हे दोघेजण भाऊ मिळून हा व्यवसाय चालवतात. चिरागचे डबल ग्रॅज्युएशन झालेले असून, त्याच्या भावाचे म्हणजे भाविकचे सुद्धा ग्रॅज्युएशन पूर्ण आहे. चिरागचे डबल ग्रॅज्युएशन होऊन सुद्धा त्याला कुठे जॉब मिळत नव्हता, अनेक ठिकाणी त्याला अनुभव असेल तरच नोकरी मिळेल असे सांगण्यात आले. म्हणूनच त्याने नोकरीचा विचार सोडून भावाच्या साथीने मोमो जोजो ला सुरुवात केली. संध्याकाळी 6.30 वाजता हा व्यवसाय सुरू करतात आणि यातूनच त्यांची दिवसाची कमाई 5000 हुन अधिक होते. अनेक खवय्ये आवर्जून ठाण्यातील या मोमो जोजो ला भेट देतात.
advertisement
मोमो जोजो या दुकानात व्हेज मोमोजमध्ये व्हेज डिलाईट, पनीर डिलाईट, पनीर आचारी, पेरी पेरी चीज, तर नॉनव्हेज मोमोजमध्ये चिकन डिलाईट, चिकन आचारी, चिकन पेरी पेरी, चिकन चीज हे सगळे प्रकार उपलब्ध आहेत. व्हेज कुरकुरे मोमोजमध्ये सुद्धा तुम्हाला इथे 10 हुन  अधिक प्रकार मिळतील. ज्यामध्ये व्हेज डिलाईट कुरकुरे मोमोज, पनीर डिलाईट कुरकुरे मोमोज, चिली चीज कुरकुरे मोमोज मिळतील. या सगळ्यांमध्ये तुम्हाला स्टीम आणि फ्राईड मोमोज सुद्धा अव्हलेबल आहेत.
advertisement
'मी शिक्षण झाल्यानंतर बऱ्याच ठिकाणी नोकरीसाठी अप्लाय केले. पण अनेकांनी मला अनुभव नसल्याने नोकरीवर घेतले नाही. पण अनुभव येण्यासाठी कुठेतरी काम करणे आवश्यक आहे. पण कुठलीच कंपनी हा विचार करत नाही. म्हणूनच मी आणि माझ्या भावाने हा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. आम्ही दोघेही पार्ट टाइम हा व्यवसाय करतो. भाऊ जिम ट्रेनर आहे, तो सकाळी सहा वाजल्यापासून ते संध्याकाळी पाच पर्यंत जिममध्ये मुलांची ट्रेनिंग घेतो' असे चिराग पाटील यांनी सांगितले.
advertisement
यांच्या इथंल विशेष वैशिष्ट्य म्हणजे पाळली जाणारी स्वच्छता. मराठी तरुणांसाठी चिराग आणि भाविक दोघेही जन आदर्श आहेत. तुम्हाला सुद्धा स्वच्छता पाळून केले जाणारे आणि चविष्ट असे वेगवेगळ्या प्रकारचे मोमोज ट्राय करायचे असतील तर नक्की ठाण्यातील वर्तक नगर येथे असणाऱ्या या मोमोजच्या दुकानाला भेट द्या.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
दोन भावांची ठाण्यात हिट जोडी, विकतायत 40 हुन अधिक प्रकारचे मोमोज, खवय्यांची गर्दी
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement