लिपस्टिकवर लिहिलेले हे 2 शब्द म्हणजे 'विष', लगेच फेकून द्या नाहीतर होईल मोठं नुकसान

Last Updated:

बाजारात मिळणाऱ्या अनेक लिपस्टिकमध्ये असे काही केमिकल्स असतात जे आपल्या शरीरासाठी हानिकारक ठरू शकतात.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
मुंबई : स्त्रियांच्या मेकअप किटमध्ये लिपस्टिक हा सगळ्यात जास्त वापरला जाणारा ब्यूटी प्रॉडक्ट आहे. ती चेहऱ्याचं सौंदर्य अधिक खुलवते, पण प्रत्येक लिपस्टिक तुमच्यासाठी सुरक्षित असेलच असं नाही. बाजारात मिळणाऱ्या अनेक लिपस्टिकमध्ये असे काही केमिकल्स असतात जे आपल्या शरीरासाठी हानिकारक ठरू शकतात.
ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. मनन वोरा यांनी सांगितलं की लिपस्टिकमध्ये वापरले जाणारे पॅराबेन्स आणि BPA (Bisphenol A) सारखे घटक शरीरातील हार्मोनल सिस्टिम बिघडवू शकतात. हे घटक इस्ट्रोजेनसारखा प्रभाव दाखवतात, ज्यामुळे पिरियड्स लेट होणे, थकवा किंवा इतर त्रास वाढू शकतो.
जर तुमच्या लिपस्टिकच्या पॅकेजिंगवर “Methyl Paraben” किंवा “Propyl Paraben” लिहिलं असेल, तर अशी लिपस्टिक वापरणं टाळा. हे घटक प्रिझर्वेटिव्ह म्हणून वापरले जातात पण शरीरासाठी नुकसानकारक ठरू शकतात. डॉ. वोरा यांनी अशा लिपस्टिक लगेच फेकून द्याव्यात असा सल्ला दिला आहे.
advertisement
BPAचं काय?
BPA सहसा प्लास्टिकच्या पॅकेजिंगमध्ये वापरलं जातं आणि तेही शरीरावर वाईट परिणाम करू शकतं. त्यामुळे पुढच्यावेळी लिपस्टिक खरेदी करताना ‘Paraben Free’ किंवा ‘BPA Free’ आहे का हे नक्की तपासा.
सुरक्षित लिपस्टिक कशा निवडाल?
स्किन स्पेशलिस्ट डॉ. रिंकी कपूर यांच्या मते आजकाल अनेक नामांकित ब्रँड्स Dermatologist Tested लिपस्टिक लॉन्च करत आहेत. त्यात Vitamin E, नैसर्गिक तेलं आणि स्क्वालेन सारखे घटक असतात जे ओठांना हायड्रेट ठेवतात. पण लक्षात ठेवा खूप जास्त मॅट लिपस्टिकचा वापर केल्यास ओठ कोरडे पडू शकतात.
advertisement
खोटे किंवा स्वस्त प्रॉडक्ट्स टाळा
बाजारात काही स्वस्त किंवा नकली लिपस्टिकमध्ये लेड (सीसा) आणि कॅडमियम सारख्या धातूंचा वापर होतो, जे दीर्घकाळ शरीराला गंभीर हानी पोहोचवू शकतात.
ओठांची योग्य काळजी कशी घ्यावी?
झोपण्यापूर्वी लिप बाम किंवा ओव्हरनाईट मास्क वापरा. आठवड्यातून 1–2 वेळा ओठांचा एक्सफोलिएशन करा. बाहेर पडताना SPF असलेली लिपस्टिक किंवा लिप बाम वापरा. नेहमी विश्वासार्ह आणि ब्रँडेड प्रॉडक्ट्सच निवडा.
advertisement
ओठ सुंदर दिसावेत म्हणून लिपस्टिक महत्त्वाची असली, तरी तिच्यातील घटक तपासून योग्य लिपस्टिकची निवड करणं अजून महत्त्वाचं आहे.
(नोट : वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे, न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही, आमचा उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
लिपस्टिकवर लिहिलेले हे 2 शब्द म्हणजे 'विष', लगेच फेकून द्या नाहीतर होईल मोठं नुकसान
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement