Dudhi Dhokla Recipe : तुम्ही कधी दुधी भोपळ्याचा ढोकळा खाल्लाय? पोषक आणि चवीलाही उत्तम, पाहा रेसिपी

Last Updated:

How to make dudhi bhopla dhokla : आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत, दुधी भोपळ्याचा ढोकळा कसा बनवायचा. तुम्हीही कधी हा ढोकळा खाल्ला नसेल तर ही वेगळी रेसिपी नक्की ट्राय करा. तुम्ही या रेसिपीचा वापर करून दुधी भोपळ्याचा ढोकळा बनवला तर तो चवीला खूपच चविष्ट होईल.

दुधी भोपळ्याचा ढोकळा कसा बनवायचा
दुधी भोपळ्याचा ढोकळा कसा बनवायचा
मुंबई : चांगल्या भाज्या सहसा मुलांना आवडत नाहीत. त्यांना चटपटीत, दिसायला सुंदर आणि खायला सोपे पदार्थ हवे असतात. मात्र प्रत्येकवेळी अशा पदार्थांमधून पोषण मिळेलच असे नाही. तशीच एक भाजी आहे. ती म्हणजे दुधी भोपळा. याचे नाव ऐकून लहान मुलंच नाही कधीकधी मोठ्या माणसांनाही ते खावेसे वाटत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अशा रेसिपीबद्दल सांगणार आहोत जी, बनवायला सोपी आणि खूप चविष्ट आहे.
आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत, दुधी भोपळ्याचा ढोकळा कसा बनवायचा. तुम्हीही कधी हा ढोकळा खाल्ला नसेल तर ही वेगळी रेसिपी नक्की ट्राय करा. तुम्ही या रेसिपीचा वापर करून दुधी भोपळ्याचा ढोकळा बनवला तर तो चवीला खूपच चविष्ट होईल आणि मुलांनाही खायला मजा येईल.
दुधी भोपळ्याचा ढोकळा बनवण्यासाठीचे साहित्य
- 1 कप दूध
advertisement
- एक कप बेसन
- एक कप दही
- एक टीस्पून हिरव्या मिरचीची पेस्ट
- अर्धा चमचा आले किसलेले
- अर्धा चमचा हळद
- चवीनुसार मीठ
- पाणी
- एक चमचा इनो
- गरजेनुसार तेल
- एक चमचा मोहरी
- 8 ते 10 कढीपत्त्याची पाने
- दोन हिरव्या मिरच्या
- एक चमचा साखर
advertisement
- धणे
दुधी भोपळ्याचा ढोकळा कसा बनवायचा
- दुधी भोपळ्याचा ढोकळा बनवण्यासाठी प्रथम एका भांड्यात बेसन आणि दही घ्या. नंतर दुधी किसून घ्या. आता या दुधीत हळद, आले आणि हिरव्या मिरचीची पेस्ट घाला. ही दुधी 10 ते 15 मिनिटे बाजूला ठेवा.
- ढोकळ्याच्या ट्रेला तेल लावा. तयार केलेल्या बॅटरमध्ये लिंबाचा रस, इनो घाला आणि हलक्या हाताने मिक्स करा. नंतर बॅटर एका ग्रीस केलेल्या प्लेटमध्ये ठेवा आणि 20 मिनिटे मंद आचेवर वाफ येऊ द्या.
advertisement
- ढोकळा तयार झाल्यानंतर चाकूच्या मदतीने त्याचे हवे तसे तुकडे कापून घ्या.
- एका कढईत तेल गरम करा. तेल गरम झाल्यावर त्यात कढीपत्त्याची पाने, हिरव्या मिरच्या, पाणी, साखर आणि लिंबाचा रस घाला आणि उकळवा. तयार केलेले मिश्रण ढोकळ्यावर टाका.
अशाप्रकारे गरमागरम दुधी भोपळ्याचा ढोकळा तयार आहे. जर तुम्ही हा ढोकळा चटणी आणि सांबारसोबत खाल्ला तर तो अजून टेस्टी लागतो. एकदा तुम्ही अशा प्रकारे दुधी भोपळ्याचा ढोकळा बनवला की तुम्हाला तो पुन्हा पुन्हा बनवावासा वाटेल. मुले हा दुधी भोपळ्याचा ढोकळा आनंदाने खातील. तुम्ही हा ढोकळा मुलांना टिफिनमध्येही देऊ शकता.
advertisement
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Dudhi Dhokla Recipe : तुम्ही कधी दुधी भोपळ्याचा ढोकळा खाल्लाय? पोषक आणि चवीलाही उत्तम, पाहा रेसिपी
Next Article
advertisement
Nanded Crime : बॉयफ्रेंडच्या मृतदेहाशी लग्न केलं, आंचलने सांगितलं थेट सांगितलं कारण, 'सक्षमसोबत...'
बॉयफ्रेंडच्या मृतदेहाशी लग्न केलं, आंचलने सांगितलं थेट सांगितलं कारण, 'सक्षमसोबत
  • बॉयफ्रेंडच्या मृतदेहाशी लग्न केलं, आंचलने सांगितलं थेट सांगितलं कारण, 'सक्षमसोबत

  • बॉयफ्रेंडच्या मृतदेहाशी लग्न केलं, आंचलने सांगितलं थेट सांगितलं कारण, 'सक्षमसोबत

  • बॉयफ्रेंडच्या मृतदेहाशी लग्न केलं, आंचलने सांगितलं थेट सांगितलं कारण, 'सक्षमसोबत

View All
advertisement