ऋतू कोणताही असो, सनस्क्रीन लावताना 'हे' लक्षात ठेवा; नाहीतर तेज जाऊ शकतं
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
डॉ. आकांक्षा जैन यांनी याविषयी माहिती दिली आहे. उन्हापासून त्वचेचं रक्षण करण्यासाठीची सर्वात पहिली पायरी म्हणजे सनस्क्रीनचा वापर आहे, असं त्या सांगतात.
रिया पांडे, प्रतिनिधी
नवी दिल्ली : उन्हाळ्यातच नाही, तर वर्षाच्या 12 महिन्यांतून कधीही घराबाहेर पडण्यापूर्वी सनस्क्रीन लावणं आवश्यक असतं, असं डॉक्टर सांगतात. कोणत्याही नॉर्मल क्रीमप्रमाणे सनस्क्रीन सहज वापरता येतं. त्यामुळे सूर्यकिरणांपासून त्वचेचं रक्षण होतं आणि त्वचेचा पोतही व्यवस्थित राहतो. परंतु सनस्क्रीन क्रीम नेमकं किती प्रमाणात वापरावं याबाबत स्किन स्पेशलिस्ट काय सांगतात, जाणून घेऊया.
advertisement
डॉ. आकांक्षा जैन यांनी याविषयी माहिती दिली आहे. उन्हापासून त्वचेचं रक्षण करण्यासाठीची सर्वात पहिली पायरी म्हणजे सनस्क्रीनचा वापर आहे, असं त्या सांगतात. सनस्क्रीन नेमकं कसं वापरावं याबाबत त्यांनी स्टेप बाय स्टेप माहिती दिली आहे.
हेही वाचा : सतत AC मध्ये राहत असाल तर सावधान! डॉक्टरांनी दिला गंभीर इशारा
डॉक्टरांनी सांगितल्यानुसार, सनस्क्रीन वापरण्यापूर्वी त्वचेवर मॉइश्चराइजर लावावं. त्यानंतरच सनस्क्रीन क्रीम वापरण्याचा सल्ला त्यांनी दिला. उन्हात जाण्याच्या 20 ते 30 मिनिटांआधी सनस्क्रीन लावायला हवं, तरच ते त्वचेत मुरतं. शिवाय सनस्क्रीन लावण्यापूर्वी ते क्रीम व्यवस्थित शेक करावं.
advertisement
एकावेळी तुम्ही 30 एमएलपर्यंत सनस्क्रीन वापरू शकता. संपूर्ण चेहऱ्यावर ठिपके लावून मग ते हळूवारपणे सर्वत्र पसरवू शकता. उन्हात गेल्यानंतर प्रत्येकी 3 तासांनी सनस्क्रीन वापरावं. डॉक्टर सांगतात की, सनस्क्रीन केवळ चेहऱ्यावरच नाही, तर मानेला, कानांना आणि हाता-पायांनाही लावू शकता. मग तुम्ही कोणत्याही ऋतूत घराबाहेर पडलात तरी त्वचेचं नुकसान होणार नाही. शिवाय लक्षात घ्या, सनस्क्रीन हे उत्तम दर्जाचंच असावं आणि कमीत कमी SPF 30 वापरावं.
advertisement
सूचना : इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. तरीही आपण आपल्या त्वचेसंबंधित कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वतः डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.
Location :
Delhi
First Published :
June 05, 2024 3:41 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
ऋतू कोणताही असो, सनस्क्रीन लावताना 'हे' लक्षात ठेवा; नाहीतर तेज जाऊ शकतं