stress management : तुम्हालाही आहे तणाव, ही पद्धत फॉलो करा, नीट लक्ष दिलं तर नक्कीच होणार फायदा!
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
प्रो. प्रणय गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘स्ट्रेस’ हा शब्द सध्याच्या जीवनशैलीमधील लोकांसाठी खूपच कॉमन झाला आहे.
उद्धव कृष्णा, प्रतिनिधी
पाटणा : स्ट्रेस म्हणजे तणाव ही समस्यांना अनेकांना जाणवत आहे. 10 पैकी 7 जणांना विविध कारणांमुळे स्ट्रेस म्हणजे तणाव असल्याचे दिसून येत आहे. ऑप्टिमम लेव्हलचा तणाव तुम्हाला अनेक प्रकारे फायदेशीर ठरतो. मात्र, त्याचीही एक विशिष्ट मर्यादा आहे आणि ती ओलांडणे नुकसानदायी आहे, असे डॉ. प्रणय कुमार गुप्ता यांनी सांगितले.
डॉ. प्रणय कुमार गुप्ता हे पाटणा येथील ट्रेंडिंग क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आहेत. यासोबतच ते सध्या कॉलेज ऑफ कॉमर्सच्या मानसशास्त्र विभागातील सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. लोकल18 च्या टीमने त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितले की, अधिक प्रमाणात स्ट्रेस झाल्यावर व्यक्तीला चिंता होऊ लागते. तो नकारात्मक होऊन जातो. या दरम्यान, त्याला खूप घामही येऊ शकतो आणि त्याचा रक्तदाबही वाढू शकतो.
advertisement
प्रो. प्रणय गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘स्ट्रेस’ हा शब्द सध्याच्या जीवनशैलीमधील लोकांसाठी खूपच कॉमन झाला आहे. विद्यार्थ्यांना किंवा तरुणाईला आपल्या करिअरची चिंता सतावत असते. त्यामळे ते अनेकदा तणावाखाली दिसून येतात. पण तणाव वाईट आहे, हा लोकांमध्ये एक गैरसमज आहे आणि तो अजिबात योग्य नाही.
ही आहे भारतातील सर्वात महागडी टॉफी, फक्त 3 महिने उपलब्ध, किंमत ऐकून तुम्हीही व्हाल चकित
ते सांगतात की, तणावात अनेक लेव्हल असतात. यामध्ये ऑप्टिमम म्हणजे (यू लेव्हल) चा स्ट्रेस हा तुम्हाला नुकसानदायी नव्हे तर फायदेशीर असतो. या लेव्हलचा तणाव असणे, अनेकदा आवश्यक असतो. कारण याच्या अभावात लोक योग्य प्रकारे आपली कामं पूर्ण करत नाही. तर ऑप्टिमम लेव्हल (यू लेवल) पेक्षा जास्त किंवा कमी तणाव हा तुमच्या काम करण्याच्या क्षमतेला प्रभावित करू शकतो.
advertisement
योग्य प्रकारे करा तणावाचं व्यवस्थापन -
प्राध्यापक प्रणय सांगतात की, ‘स्ट्रेस इज द स्पाइस ऑफ लाइफ अँड किस ऑफ डेथ’. याचा अर्थ असा की, जर एखाद्या व्यक्तीवर योग्य प्रमाणात कोणत्याही प्रकारचा ताण येत असेल तर त्याची कार्यक्षमता सुधारते. तर तणावाची पातळी अधिक वाढल्यावर हे तुमच्यासाठी अधिक हानिकारक होऊ शकते. म्हणून तणावर संपवण्याऐवजी त्याचे एका विशिष्ट दिशेने व्यवस्थापन करण्याचा प्रयत्न करायला हवे. यामुळे तुम्ही आयुष्य चांगल्या प्रकारे जगू शकतात.
advertisement
एका निर्णयानं बदललं दहावी नापास तरुणाचं आयुष्य, आज वर्षाला करतोय लाखो रुपये कमाई
तणाव कमी करण्याचेही अनेक प्रकार आहे. यामध्ये प्रॉब्लेम फोकस्ड कोपिंग, इमोशनल कोपिंग आणि रिलॅक्सेशन पद्धतीचा समावेश आहे. खरंतर या पद्धतीनेही तुम्ही तुमच्या तणावावर नियंत्रण ठेवू शकत नसल्यास, मानसशास्त्रज्ञाचा सल्ला घेऊ शकता. दरम्यान, तुम्हाला तणाव जाणवत असेल किंवा तणाव व्यवस्थापनाबाबत इतर कोणतीही माहिती हवी असेल तर तुम्ही 7004791426 या क्रमांकावर प्राध्यापक प्रणय कुमार गुप्ता यांच्याशी संपर्क साधू शकता, अशी माहितीही त्यांनी दिली.
Location :
Patna,Bihar
First Published :
June 12, 2024 1:15 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
stress management : तुम्हालाही आहे तणाव, ही पद्धत फॉलो करा, नीट लक्ष दिलं तर नक्कीच होणार फायदा!