खरंच चहा पिल्याने चेहरा काळा पडतो का ? आहार तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती
- Published by:News18 Marathi
Last Updated:
आपली सकाळ एक कप चहानेच सुरू होते. पण चहाने खरंच चेहरा काळवंडतो का? इथं पाहा.
छत्रपती संभाजीनगर, 1 नोव्हेंबर : आपल्याकडे प्रत्येकाची सकाळ ही गरमागरम चहानेच होते. तरीही चहा पिणं आरोग्यास चांगलं की अपायकारक याबाबत मात्र सातत्याने चर्चा होत असते. त्याबाबत काही समज गैरसमजही आहेत. खरंच चहा पिल्याने चेहरा काळा पडतो का? चहा पिण्याचे तोटे काय आहेत? याबाबत छत्रपती संभाजीनगर येथील आहार तज्ज्ञ अलका कर्णिक यांनी माहिती दिली आहे.
चहा एक उत्तेजक पेय
चहा हे एक उत्तेजक पेय आहे. यातून शरीरास उपयुक्त कोणतेही घटक मिळत नाहीत. मात्र, तुम्ही वारंवार चहा घेतल्यास त्याचा पचनसंस्थेवर वाईट परिणाम होतो. भूक मंदावते आणि रोग प्रतिकारक शक्ती कमी होते. तसेच चहामुळे झोपेवरही परिणाम होतो. त्यामुळे चहा योग्य प्रमाणात घेणं गरजेचं आहे, असे आहार तज्ज्ञ सांगतात.
advertisement
चहामुळे चेहरा काळवंडतो?
चहा पिल्याने चेहरा काळा पडतो असं सांगितलं जातं. पण त्यात अजिबात तथ्य नाही. चहामुळं चेहरा काळा पडत नाही. मात्र, चहातील टॅनिनमुळं झोप लागत नाही. झोप व्यवस्थित न झाल्यामुळे चेहऱ्यावर विशेषत: डोळ्यांच्या खाली काळे वर्तूळ निर्माण होण्याची शक्यता असते. तसेच असहजता वाटणे, नकारात्मक भावना येणे यासारखे परिणामही दिसून येतात. झोप न झाल्याचा परिणाम चेहरा काळवंडणे असू शकतो. पण चहाचा नाही, असंही कर्णिक सांगतात.
advertisement
चहा घेताना ही काळजी घ्या
चहा घेताना योग्य प्रमाणात घेणं गरजेचं आहे. वारंवार चहा घेणं आरोग्यास अपायकारक आहे. जास्त डार्क किंवा कडक चहा घेऊ नये. त्याचा परिणाम थेट पचनसंस्थेवर होतो आणि त्याचा आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असते, असेही आहार तज्ज्ञ सांगतात.
Location :
Chhatrapati Sambhaji Nagar,Maharashtra
First Published :
November 01, 2023 8:20 AM IST