कॅन्सरवर मात करण्यासाठी मांसाहार करावा का? तुमच्या प्रश्नाचं इथं उत्तर
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
योग्य आहार घेतल्यास कॅन्सरग्रस्त रुग्णही आजारावर लवकर मात करू शकतात. सध्याच्या काळात निरोगी जीवनासाठी आहार चांगला असणं गरजेचं आहे.
advertisement
ज्या महिलांना कॅन्सर झालेला आहे किंवा त्यांची केमोथेरेपी झालेली आहे, त्यांनी आहारावर लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. छत्रपती संभाजीनगर येथील आहार तज्ज्ञ अलका कर्णिक यांनी याबाबतच माहिती दिली आहे.
advertisement
कॅन्सरग्रस्त रुग्ण बऱ्याचदा खाण्या-पिण्याकडं दुर्लक्ष करतात. केमोथेरपी झालेली असेल तर खाण्याची इच्छा होत नाही. तेव्हा रुग्ण दोन वेळेस जेवण करत असेल तर ते आठ भागात थोडं थोडं करून रुग्णाल देऊ शकता. जेवण हे कोमट व पातळ स्वरूपात द्यावं. त्यामुळे ते पचायला सोपं जातं. यामध्ये पातळ खीर त्याचबरोबर पोळीचा चुरमा करून त्यासोबत देता येईल, असे कर्णिक सांगतात.
advertisement
कॅन्सरग्रस्त रुग्णांना जंकफूड देणं टाळा, तसेच मांसाहारी पदार्थ देणं टाळावं. या काळात जड अन्न पचायला त्रास होतो. त्यामुळे मांसाहार शक्यतो देऊ नये. त्यासोबत मिरची, मसाल्यांचा अधिक वापर असणारे पदार्थही टाळावेत. मात्र, मांसाहारी व्यक्तीला फारतर बॉईल केलेलं एखादं अंडं देऊ शकता, असे आहारतज्ज्ञ सांगतात.
advertisement
advertisement
advertisement
कॅन्सरग्रस्त रुग्णांना तळलेले किंवा कच्चे पदार्थ खाण्यास देणे टाळावे. शक्यतो उकडून, वाफवून देणे चांगले राहते. बदाम भिजवून द्यावेत. ड्रॅगन फ्रुट, सीताफळ सारखी फळे तुम्ही देऊ शकता. तसेच भाकरीला तूप लावून किंवा फुलका बनवून विना मसाला खायला द्यावे. अशाप्रकारे आहाराची काळजी घेतल्यास रुग्ण बरा होण्यास मदत होते, असे कर्णिक सांगतात.