HIV संक्रमण झाल्याचं कसं कळतं? लक्षणं काय? कसा करायचा बचाव?

Last Updated:

AIDS चा संसर्ग झाल्याची लक्षणे आणि प्रतिबंधात्मक उपाय डॉक्टरांकडून जाणून घ्या

News18
News18
अरुणकुमार गोस्वामी
धनबाद (झारखंड): एड्स किंवा HIV चा धोका अद्याप कमी झालेला नाही. या आजाराविषयी फारसे बोलले जात नसले तरी या जिवघेण्या आजाराबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. एड्सचा प्रतिबंध करणे तेव्हाच सोपे जाईल जेव्हा एड्स कशामुळे होतो, लक्षणे काय  हे लक्षात येईल.
धनबादचे सामुदायिक आरोग्य केंद्र (CHC) गोविंदपूर एचआयव्ही जनजागृती मोहीम राबवत आहे, ज्यामध्ये लोकांना एचआयव्हीची लक्षणे आणि त्यापासून बचाव करण्याच्या पद्धतींबद्दल जागरूक केले जात आहे. या मोहिमेअंतर्गत एचआयव्ही तपासणीसाठी किट आणि रक्त तपासणीचा वापर केला जात आहे.
advertisement
एचआयव्ही एड्स म्हणजे काय?
गोविंदपूर कम्युनिटी हेल्थ ऑफिसर (CHO) रुखसार फातिमा आणि नर्स मिडवाइफ (NM) रोमनी मरांडी यांनी लोकल 18 ला सांगितले की HIV हा एक गंभीर आजार आहे जो असुरक्षित संभोग, संक्रमित सुयांचा वापर आणि संक्रमित रक्ताच्या देवाणघेवाणीमुळे पसरतो. त्या म्हणाल्या की, योग्य माहितीच्या अभावामुळे लोकांना या आजाराचे गांभीर्य समजत नाही, ज्यामुळे तो आणखी धोकादायक बनतो.
advertisement
एचआयव्ही लक्षणे
एचआयव्हीच्या लक्षणांबद्दल बोलताना रुखसार फातिमा म्हणाल्या की, या विषाणूमुळे शरीराची प्रतिकारशक्ती कमकुवत होते. परिणामी, संक्रमित व्यक्तीला दीर्घकाळ ताप, वजन कमी होणे, शारीरिक कमजोरी आणि इतर आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागते. रक्ततपासणीतून HIV ची बाधा झाली आहे का हे लक्षात येते.
एचआयव्ही प्रतिबंधक उपाय
एचआयव्ही रोखण्यासाठी उपाययोजनांवर भर देत त्यांनी सुरक्षित लैंगिक संबंध ठेवण्याचा आणि संबंधादरम्यान संरक्षण (कंडोम) वापरण्याचा सल्ला दिला. नियमित तपासणी करणे देखील खूप महत्वाचे असल्याचे सांगण्यात आले. गोविंदपूर सामुदायिक आरोग्य केंद्रात एचआयव्ही चाचणी सुविधा उपलब्ध आहे, जिथे संक्रमित व्यक्तींना तात्काळ वैद्यकीय मदत दिली जाते.
advertisement
या जनजागृती मोहिमेचा मुख्य उद्देश लोकांना एचआयव्हीबाबत योग्य माहिती देणे आणि त्यापासून बचाव करण्यासाठीच्या उपाययोजनांबाबत जागरूक करणे हा आहे.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
HIV संक्रमण झाल्याचं कसं कळतं? लक्षणं काय? कसा करायचा बचाव?
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement