advertisement

जखम लवकर बरी करायला मदत करते 'ही' वनस्पती; पाहा काय आहेत बहुगुणी फायदे

Last Updated:

कंबरमोडी ही एक सूर्यफूल कुळातली लहान वनस्पती आहे. कंबरमोडीचे कोणते कोणते फायदे आहेत पाहा

+
News18

News18

अमिता शिंदे, प्रतिनिधी
वर्धा: कंबरमोडी ही एक सूर्यफूल कुळातली लहान वनस्पती आहे. ही मुरुमाड प्रदेशात जास्त उगवते. भारतात शेतांमध्ये आणि पडक्या जमिनीवर उगवणारे हे एक तण आहे. पायाला ठेच लागून, वा कोणत्याही प्रकारे जखम झाली असता, या वनस्पतीच्या पानाचा रस काढून त्यावर टाकला असता जखम लवकर बरी होते. अशाप्रकारे कंबरमोडीचे कोणते कोणते फायदे आहेत आणि कंबरमोडीचा उपयोग आपल्या आरोग्यासाठी आपण कशा प्रकारे करू शकतो? यासंदर्भात वर्ध्यातील आयुर्वेदिक डॉक्टर नितीन मेशकर यांनी माहिती दिली आहे.
advertisement
जखम लवकर होते बरी 
कंबरमोडी ही सर्वांना परिचित अशी वनस्पती आहे. घराच्या आजूबाजूला सहज आढळते. विशेषतः ज्याठिकाणी पाण्याची कमतरता आहे त्याठिकाणी ही वनस्पती मोठ्या प्रमाणात उगवते. कोणालाही थोडीही जखम झाली, ठेच लागली की कंबरमोडीचा पाला हातावर घासून त्याचा रस काढून त्या जखमेवर लावला जातो. त्यामुळे जखम लवकर भरून येते. जखम बरी होते, असं डॉ. नितीन मेशकर सांगतात.
advertisement
पित्तनाशक कंबरमोडी
ही अतिशय उपयोगी वनस्पती दुर्लक्षित आहे. आजही आपण त्याचा म्हणावा तेवढा उपयोग करत नाही. आम्लपित्त किंवा मुळव्याध यासारख्या त्रासांवर देखील कंबरमोडी उपयुक्त आहे. रक्तस्राव होत असल्यास, कंबरमोडीचा पाला फायदेशीर ठरतो. बाहेरच्या जखमांसाठी हाडांच्या मजबुतीसाठी,रक्त वाढण्यासाठी किंबहुना अनेक दुर्धर आजारांवर ही वनस्पती फायदेशीर आहे. कंबरमोडीच पाला खूप चांगला आहे. आपण याचा उपयोग करायला पाहिजे निसर्गाने दिलेली ही चांगली देणगी आहे. एकही रुपयाचा खर्च नाही निःशुल्क मिळणारी ही वनस्पती औषधी आहे.
advertisement
खाऊ शकतो कंबरमोडी
कंबरमोडी वनस्पती आपण खाऊ देखील शकतो. गोड रसयुक्त ही वनस्पती आहे. त्याची चार-चार पाने आपण खाऊ शकतो. तुपा सोबत खाऊ शकतो किंवा त्याचा चूर्ण बनवून देखील त्याचा सेवन करू शकतो, असंही डॉ. नितीन मेशकर सांगतात.
रक्तदाब आणि शुगर पासून मिळेल आराम; फक्त 10 मिनिट करा 'ही' थेरेपी Video
ही जमिनीपासून साधारण फूटभर वाढणारी वनस्पती आहे. कंबरमोडी ही वेलासारखी भुईसपाट पसरत जाणारी वनस्पती असून अतिशय नाजूक असते. हिला थोडाही धक्का लागला तर ती कुठूनही तुटते. अशा या सहज उपलब्ध होणाऱ्या कंबरमोडी वनस्पतीचे अनेक फायदे आहेत.
advertisement
(टीप : बातमीतील मतं ही तज्ज्ञांची वैयक्तिक आहेत. त्याचे अनुकरण करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. News18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
जखम लवकर बरी करायला मदत करते 'ही' वनस्पती; पाहा काय आहेत बहुगुणी फायदे
Next Article
advertisement
Gold Price : सोनं १६०००० रुपयांच्या पार! आता खरेदी करणं शहाणपणाचं की ठरेल घाई? पाहा काय म्हणतात एक्सपर्ट
सोनं १६०००० रुपयांच्या पार! आता खरेदी करणं शहाणपणाचं की ठरेल घाई? पाहा काय म्हणत
  • मागील काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या दरात मोठ्या प्रमाणावर तेजी दिसून आली आहे

  • सोनं-चांदीच्या दराने ऑलटाइम हाय गाठला आहे.

  • आता सोनं खरेदी करावं की थोडं थांबावं असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

View All
advertisement