कागदी कपामध्ये चहा पिताय? आताच थांबवा, केमिकल्स पोटात गेल्यामुळे होऊ शकतो ‘हा’ आजार, Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
आपण सर्वजण प्लास्टिकच्या किंवा पेपरच्या कपमध्ये चहा घेतो. मात्र हे घेणे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असते.
अपूर्वा तळणीकर, प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : आपल्याकडे कुठलाही कार्यक्रम असू द्या किंवा आपण ऑफिसमध्ये जाऊ द्या आपण सर्वजण प्लास्टिकच्या किंवा पेपरच्या कपमध्ये चहा घेतो. मात्र हे घेणे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असते. त्यासोबतच आता प्रत्येक चहाच्या टपरीवर देखील प्लास्टिकच्या कपात किंवा कागदी कपामध्ये चहा दिला जातो. तर याचे काय दुष्परिणाम आपल्या शरीरावरती होतात? याबद्दलच आहार तज्ज्ञ रसिका देशमुख यांनी माहिती दिली आहे.
advertisement
कागदापासून बनवलेले कप वापरल्याने आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतो. एवढंच नाही, तर पेपर कपमुळे निसर्गाचंही नुकसान होतं. त्यामुळे प्लास्टिक कप्ससोबत पेपर कप्सचाही वापर टाळला पाहिजे. डिस्पोजेबल कप्समध्ये बिस्फेनॉल आणि बीपीए ही केमिकल्स मोठ्या प्रमाणात असतात. जेव्हा या कपमधून चहा किंवा गरम पाणी प्यायलं जातं, तेव्हा त्यातली केमिकल्स त्यामध्ये विरघळू लागतात. ही केमिकल्स सतत पोटात गेल्याने कॅन्सर होऊ शकतो. त्यामुळे डिस्पोजेबल कपमधून गरम पाणी किंवा चहा कधीही पिऊ नये, असं रसिका देशमुख सांगतात.
advertisement
तुम्हाला जर बाहेर चहा घ्यायचा असेल तर तुम्ही एक तर मातीचा कपमध्ये किंवा काचेच्या कपमध्ये त्याचबरोबर चिनीमातीच्या कपमध्ये किंवा स्टेनली स्टीलच्या कपमध्ये चहा घ्यावा. त्यामुळे या जर कपात तुम्ही चहा घेतला तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही किंवा तुमच्या शरीरावरती कुठल्याही दुष्परिणाम होणार नाही. त्यामुळे जर तुम्हाला बाहेर चहा घ्यायचा असेल तर प्लास्टिकचा कप किंवा कागदाचा कपमध्ये चहा घेणे टाळावे, असंही रसिका देशमुख सांगतात.
advertisement
view comments
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
January 20, 2025 5:28 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
कागदी कपामध्ये चहा पिताय? आताच थांबवा, केमिकल्स पोटात गेल्यामुळे होऊ शकतो ‘हा’ आजार, Video

