Healthy Drink : रोज सकाळी प्या या पानांचे पाणी, पोटातल्या आगीसह सर्व समस्यांपासून मिळेल आराम
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
या ऋतूमध्ये बहुतेक लोकांना पोटात उष्णता जाणवते. विशेषत: जेव्हा जेवल्यानंतर, केवळ शरीरातच नाही तर पोटातही उष्णता वाढते. यासोबतच उन्हाळ्यात जुलाब होण्याची शक्यताही अधिक असते.
मुंबई : उन्हाळ्यात गर्मी आणि घामासह बऱ्याच लोकांना पोटाचे त्रासही होतात. पोटात आग होणे किंवा बद्धकोष्टता हे त्यापैकीच काही. या ऋतूमध्ये बहुतेक लोकांना पोटात उष्णता जाणवते. विशेषत: जेव्हा जेवल्यानंतर, केवळ शरीरातच नाही तर पोटातही उष्णता वाढते. यासोबतच उन्हाळ्यात जुलाब होण्याची शक्यताही अधिक असते. काही वेळा पोटात उष्णतेमुळे उलट्या आणि मळमळण्याची तक्रारही वाढते. आज आपण या यावर एक रामबाण औषध पाहणार आहोत.
या सर्व समस्यांचे एक उत्तर म्हणजे पुदिन्याची पाने. पुदिन्याच्या पानांचा प्रभाव इतका थंड असतो की, काही वेळातच पोटात गारवा जाणवू लागतो. यामुळे पोट तर थंड होईलच पण इतर अनेक समस्या दूर होतील. पुदिन्याच्या पानांमुळे पचनक्रिया सुधारते आणि वजन कमी होण्यासही मदत होते. इतकंच नाही तर पुदिन्याच्या पानांच्या सेवनाने मधुमेह देखील आटोक्यात ठेवता येतो.
advertisement
अनेक रोगांवर रामबाण उपाय
हेल्थलाइनच्या बातम्यांनुसार, पुदिन्याची पाने हजारो वर्षांपासून औषधी म्हणून वापरली जात आहेत. पुदिन्यात नगण्य कॅलरीज आणि साखर असते. याशिवाय यामध्ये प्रथिने, फायबर, अनेक प्रकारची खनिजे, अँटीऑक्सिडंट्स आणि मोलिब्डेनम कंपाऊंड असतात. पुदिन्यात बायोएक्टिव्ह फायटोन्यूट्रिएंट्स असतात, जे एकंदर आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात.
खाज येणे, इन्फेक्शन इत्यादी रोगांचा नाश करण्यासाठी पुदिन्यात सूक्ष्मजीवविरोधी शक्ती असते. याशिवाय, पुदिन्यात दाहक-विरोधी गुणधर्म आहेत. म्हणजेच ते पेशींमध्ये सूज येऊ देत नाही, ज्यामुळे ते जुनाट आजारांचा धोका कमी करते. याशिवाय पुदिन्याच्या पानांमध्ये अनेक आजारांचा धोका कमी करण्याची ताकद असते.
advertisement
आतड्याच्या स्नायूंना शांत करते..
सिंगापूरच्या माउंट शिने हॉस्पिटलच्या अभ्यासात पुदिन्याच्या पानांमध्ये आतड्यांतील स्नायूंना आराम देण्याची क्षमता असल्याचे आढळले आहे. त्यामुळे पोटात पित्ताचा प्रवाह निर्माण होतो. पित्ताचा प्रवाह वाढल्याने पोटात जास्त तेल असलेले अन्न पचायला सोपे जाते. त्यामुळे अन्नाचे पचनही जलद होते. आतड्याच्या स्नायूंना आराम दिल्याने गॅस आणि ब्लोटिंगची समस्याही सहज कमी होते.
advertisement
ज्यां लोकांना आधीच इरिटेबल बोवेल सिंड्रोम आहे, अशा लोकांसाठीही पुदिना फायदेशीर आहे. म्हणजेच अन्न खाल्ल्यानंतर पोट फुगायला लागते आणि गॅसची समस्या वाढते. यामुळे पोटदुखी किंवा क्रॅम्पची तक्रारही कमी होते. म्हणजेच सकाळी लवकर पुदिन्याची पाने पाण्यासोबत प्यायल्यास पोटातील सर्व उष्णता तर दूर होईलच पण पोटाच्या इतर समस्याही संपतील. मात्र, पोटाशी संबंधित आजार असल्यास एकदा डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.
advertisement
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
April 15, 2024 9:08 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Healthy Drink : रोज सकाळी प्या या पानांचे पाणी, पोटातल्या आगीसह सर्व समस्यांपासून मिळेल आराम