Sleeping position in Pregnancy : प्रेग्नंट झाल्यावर रात्री कोणत्या कुशीवर झोपावं? डाव्या की उजव्या?

Last Updated:

How to sleep in pregnancy : जीवनशैलीसोबतच आपल्या झोपण्याच्या स्थितीचाही शरीरावर परिणाम होतो. अशा परिस्थितीत चांगली झोप कशी घ्यावी हा प्रश्न आहे.

प्रतीकात्मक फोटो
प्रतीकात्मक फोटो
नवी दिल्ली :  निरोगी राहण्यासाठी चांगली झोप घेणं अत्यंत आवश्यक आहे. मानवी जीवनाशी संबंधित ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. जीवनशैलीसोबतच झोपण्याच्या स्थितीचाही मानवी शरीरावर परिणाम होतो. असं न केल्यास, एखादी व्यक्ती अनेक गंभीर समस्यांना सामोरं जाऊ शकते. कारण, झोपण्याची योग्य स्थिती शरीराचं कार्य सुधारण्यास आणि पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करते. अशा परिस्थितीत चांगली झोप कशी घ्यायची, असा प्रश्न पडतो. झोपण्यासाठी कोणती बाजू चांगली आहे? गर्भधारणेदरम्यान कोणत्या बाजूला झोपणं चांगलं आहे? ते पाहुयात.
दिवसभर काम करून थकल्यानंतर रात्री चांगली झोप घेणं खूप गरजेचं आहे. पण, याआधी तुम्ही कोणत्या बाजूला झोपत आहात हे देखील लक्षात ठेवावं लागेल. हेल्थलाइनच्या अहवालानुसार, तुम्ही कोणत्याही एका बाजूला झोपल्यास आणि तुमची स्थिती योग्य असल्यास त्या बाजूने सांधेदुखी आणि पाठदुखी कमी होते. पण, डाव्या बाजूला झोपणे आरोग्यासाठी अधिक फायदेशीर मानले जाते. कारण डाव्या बाजूला झोपल्याने शरीराला आराम मिळतो आणि अनेक फायदेही दिसून येतात.
advertisement
योग्य कुशीवर झोपण्याचे 5 मोठे फायदे
1) उजव्या बाजूला झोपल्याने पोटाचं आरोग्य सुधारतं. तुम्हाला पोट खराब होणं किंवा खराब पचन यांसारख्या समस्या असल्यास, डाव्या बाजूला झोपा. असं केल्याने, आपण पचनामध्ये बरीच सुधारणा पाहू शकता.
2) झोपेत घोरल्याने झोपेचा त्रास होतो. अशा परिस्थितीत, डाव्या बाजूला झोपण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून वायुमार्ग मोकळे राहतील आणि तुमची जीभ आणि टाळू आकुंचन पावणार नाहीत. याच्या मदतीने घोरणं कमी करता येते.
advertisement
3) बद्धकोष्ठतेसारख्या समस्या कमी करण्यासाठी डाव्या बाजूला झोपणं अधिक फायदेशीर मानलं जातं. असे केल्याने हार्ट बर्न, बद्धकोष्ठता आणि पोट फुगणे यासारख्या समस्यांपासून आराम मिळू शकतो.
4) आजच्या जीवनशैलीत सांधेदुखीचा त्रासही लोकांना होत आहे. अशा स्थितीत डाव्या बाजूला उजवीकडे झोपल्यास सांधेदुखीपासून काही प्रमाणात आराम मिळू शकतो.
5) बाजूला योग्य स्थितीत झोपल्याने मधुमेह आणि हृदयविकाराचा झटका यांसारख्या आजारांचा धोका कमी होतो. मात्र, तुम्ही घेत असलेली औषधे तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार सुरू ठेवावी लागतात.
advertisement
गर्भवती महिलांनी कोणत्या बाजूला झोपावं?
गर्भधारणा हा खूप आनंदाचा क्षण असतो, पण त्यासाठीही तेवढीच सावधगिरी बाळगणं आवश्यक असते. या काळात खाण्यापासून ते झोपेपर्यंतच्या दिनचर्येकडे लक्ष दिलं पाहिजे. विशेषतः तुमची झोपण्याची स्थिती. कारण, डॉक्टर अनेकदा गर्भवती महिलांना डाव्या बाजूला झोपण्याचा सल्ला देतात. कारण ते प्लेसेंटामध्ये योग्य रक्तप्रवाह राखतं आणि गर्भवती महिलांमध्ये प्री-एक्लॅम्पसिया किंवा उच्च रक्तदाबाचा धोका कमी करतं.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Sleeping position in Pregnancy : प्रेग्नंट झाल्यावर रात्री कोणत्या कुशीवर झोपावं? डाव्या की उजव्या?
Next Article
advertisement
Eknath Shinde Sharad Pawar : शरद पवारांना वाढदिवसानिमित्ताने एकनाथ शिंदेंच्या खास शुभेच्छा, ''तुम्ही...'', पाहा Video
शरद पवारांना वाढदिवसानिमित्ताने एकनाथ शिंदेंच्या खास शुभेच्छा, ''तुम्ही...'',
  • शरद पवारांना वाढदिवसानिमित्ताने एकनाथ शिंदेंच्या खास शुभेच्छा, ''तुम्ही...'', Vi

  • शरद पवारांना वाढदिवसानिमित्ताने एकनाथ शिंदेंच्या खास शुभेच्छा, ''तुम्ही...'', Vi

  • शरद पवारांना वाढदिवसानिमित्ताने एकनाथ शिंदेंच्या खास शुभेच्छा, ''तुम्ही...'', Vi

View All
advertisement