कधी खाल्लंय का बांबूचं लोणचं? या राज्यात मिळते ही फेमस डिश, जाणून घ्या रेसिपी
- Published by:Pooja Pawar
- local18
Last Updated:
खोरिसा हा आसाम येथील एक प्रसिद्ध पदार्थ असून खरंतर हे एक लोणचं आहे, ज्याला इंग्रजीत बांबू शूट असे म्हणतात. तेव्हा हे कसे बनवले जाते याची रेसिपी जाणून घेऊयात.
बांबूच्या कोंबांपासून बनवलेलं हे लोणचं आशियातील विविध देशांमध्ये अतिशय चवीने खाल्लं जातं. परंतु वेगवेगळ्या भागात ते वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं. आसामच्या मैदानी भागात राहणाऱ्या लोकांच्या प्रमुख आहारात त्याचा समावेश होतो. या लोणच्यात अनेक औषधी गुणधर्म असतात, असं मानलं जातं.

advertisement
बांबूला साधारण श्रावण किंवा भाद्रपद महिन्यात कोंब येतात. या कोंबांपासून खोरिसा बनवला जातो. हे लोणचं बनवण्यासाठी बाबूंच्या वरील मऊ भाग कापून त्याचे लहान-लहान तुकडे एका भांड्यात झाकून ठेवले जातात. या अंकुराची साल काळजीपूर्वक सोलली नाही तर ती ओली होते. बाबूंचे हे तुकडे केळीच्या पानात गुंडाळून चार ते पाच दिवस चुलीजवळ ठेवले जातात. मग भांड्यात किंवा बांबूच्या कोंबांनी भरलेली बाटली उन्हात ठेवली जाते.
advertisement

काही लोक यात पाणी आणि चवीनुसार विविध पदार्थ घालतात. आंबट लोणचं तर अनेकांना आवडतं, जेव्हा या मिश्रणाचा सुगंध येऊ लागतो तेव्हा ते तयार झालंय असं मानलं जातं. अनेकजण यात हळदही घालतात. कोरडं झाल्यानंतर हे मिश्रण गोठतं. त्याला 'कोरडा खोरिसा' म्हणतात.
advertisement

वाळलेल्या खोरिसाचा लोक वर्षभर वापर करतात. आसाममध्ये उन्हाळ्यात कोंब सुकवून त्यात डाळी मिसळून खाण्याची परंपरा आहे.

advertisement
भाजीपाला, मासे, अंडी, मांस इत्यादींमध्ये खोरिसा घालून विविध पदार्थ तयार केले जातात. कच्चा खोरिसा चटणी म्हणून मासे आणि इतर मांसाहारी पदार्थांसोबत खाल्ला जातो.
Location :
Assam
First Published :
September 16, 2023 7:46 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
कधी खाल्लंय का बांबूचं लोणचं? या राज्यात मिळते ही फेमस डिश, जाणून घ्या रेसिपी