Leg Cramps at night: हिवाळ्यात पायात क्रॅम्स् येतात? वापरा ‘या’ सोप्या टिप्स, पेटके जातील पळून
- Published by:Tushar Shete
Last Updated:
Tips to get rid of Leg cramps in Marathi: पोटऱ्या, तळवे किंवा मांड्यामध्ये येणारे क्रॅम्प्स् भलेही काही सेकंदासाठी येत असले तरीही ते येतात तेव्हा मरणासन्न वेदना होतात. हे पेटके जर जास्त काळ राहिले मृत्यूस कारणीभूत ठरू शकतात. जाणून पेटक्यांचा त्रास दूर करण्याच्या सोप्या टिप्स्.
मुंबई: हिवाळ्यात गुलाबी थंडीचा आनंद घेत जेव्हा तुम्ही ब्लॅकेट, रजई ओढून शांत झोपलेले असता, तेव्हा अचानक पायांमध्ये मरणासन्न वेदना देणारे क्रॅम्पस किंवा पेटके येतात. ज्यामुळे तुमची झोपमोड तर होतेच मात्र या वेदनादायी पेटक्यांमुळे तुम्हाला ब्रम्हांड आठवतं. पोटऱ्या, तळवे किंवा मांड्यामध्ये येणारे क्रॅम्प्स् भलेही काही सेकंदासाठी असले तरीही ते जर जास्त काळ राहिले तर तुमच्या मृत्यूस कारणीभूत ठरू शकतात. क्रॅम्प्स् आल्यानंतर शरीराची अगदी तसूभरही हालचाल करणं कठीण जातं. जाणून घेऊयात नेमके पेटके काय येतात ? आणि त्याच्यावर नेमके उपाय काय आहेत ते.
सर्वसामान्यपणे जेव्हा पायांचे स्नायू जेव्हा ताणले जातात किंवा त्यांच्या नियमित जागेवरून ते दुसरीकडे हलले जातात तेव्हा क्रॅम्प्स्, पेटके किंवा पायात गोळे येतात. काही वर्षांपूर्वीपर्यंत वृद्धांना पेटक्यांचा त्रास जाणवत होता. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून तरूणांनाही पेटक्यांचा त्रास होऊ लागलाय. शरीरातल्या पेशी तंदुरूस्त नसणं किंवा शरीराला योग्य त्या प्रमाणात रक्ताचा पुरवठा झाला नाही तर पेटक्यांचा त्रास होऊ शकतो. ज्या व्यक्तींची मूत्रपिंड निकामी झाली आहेत किंवा त्यांच्या मज्जातंतूंचं नुकसान झालं अशा व्यक्तींना पेटक्यांचा सर्रासपणे त्रास होतो.
advertisement
चुकीच्या सवयी
सध्याची धकाधकीची जीवनशैली ही सुद्धा पेटक्यांच्या त्रासाला निमंत्रण देणारी ठरली आहे. सतत एकाच जागी जास्त वेळ बसून राहणं, जास्त व्यायाम करणं, बसताना चुकीच्या पद्धतीनं बसणं, नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने एकाच जागी जास्त वेळ उभं राहणं, यामुळे सुद्धा कॅम्प्स् येऊ शकतात. याशिवाय अतिमद्यपान करणाऱ्या व्यक्तींना सुद्धा पेटक्यांचा त्रास होत असतो. ज्यांना मज्जातंतूंचे विकार, एडिसन रोग, ॲनिमिया म्हणजेच हिमोग्लोबिनची कमतरता, सिरोसिस आजार, उच्च रक्तदाब, हायपोग्लायसेमिया, हायपोथायरॉइड, हायब्लडप्रेशरचा त्रास आहे अशा व्यक्तींना पेटक्यांचा त्रास होतो. याशिवाय ज्या व्यक्ती पाणी पिणं टाळतात त्यांना क्रॅम्प्स् चा त्रास होतो. कारण कमी पाणी प्यायल्यामुळे डिहायड्रेशन होतं. याशिवाय रक्तातला सोडियम, पोटॅशियम आणि कॅल्शियमचा असमतोल पेटक्यांच्या त्रासाला आमंत्रण देतो. पोटॅशियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सारख्या खनिजांच्या कमतरतेमुळे पायात गोळे येतात.
advertisement

उपाय काय ?
पायात किंवा पोटऱ्यांमध्ये येणारे पेटके काही मिनिटांत निघून जातात. मात्र ते जर जास्तवेळ रहात असतील तर ते धोक्याचं आहे. अशावेळी पायांना मॉलिश केल्याने पेटक्यांचा त्रास कमी होऊ शकतो. याशिवाय स्ट्रेचिंग सारख्या व्यायामाने पेटके जाऊ शकतात. मात्र जेव्हा तुमच्या पायात पेटके येतील तेव्हा फार हालचाल करणं टाळा. यामुळे तुमच्या शरीराला गंभीर नुकसान होऊ शकतं. जेव्हा पेटके येतात तेव्हा पाय सरळ ठेवून चालण्याचा प्रयत्न करा. पेटक्यांचा त्रास कमी करण्यासाठी तुम्हाला दैनंदिन गरजेइतकं पाणी हे प्यावंच लागणार आहे. याशिवाय जंकफूड टाळून सकस व पौष्टिक आहार घ्या. जेणेकरून शरीराला पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि कॅल्शियमची पूर्तता होऊ शकेल. केळी, दूध आणि हिरव्या पालेभाज्या या खनिजांचे चांगले स्रोत आहेत. नियमितपणे व्यायामाची सवय ठेवा. किमान घरातल्या घरात हलका व्यायाम करा जेणेकरून स्नायू लवचिक राहतील आणि पेटक्यांचा त्रास होणार नाही.
advertisement
तुम्हाला जर वारंवार पेटक्यांचा त्रास होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेऊन आवश्यक त्या शारीरिक चाचण्या करून घ्या. ज्यामुळे तुम्हाला जर कोणता गंभीर आजार असेल तर त्याचं वेळीच निदान होऊ शकतं.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 06, 2025 3:42 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Leg Cramps at night: हिवाळ्यात पायात क्रॅम्स् येतात? वापरा ‘या’ सोप्या टिप्स, पेटके जातील पळून